IND vs PAK : टीम इंडियाला महामुकाबल्याआधी झटका, स्टार खेळाडूबाबत मोठी अपडेट, उपकर्णधार शुबमनने सांगितलं..
Indian Cricket Team : पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी 'ताप'दायक बातमी समोर आली आहे. जाणून घ्या नक्की काय झालंय?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत रविवारी 23 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. तर पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा आरपारचा सामना आहे. तर टीम इंडियाला पाकिस्तानचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. अशात हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या मुख्य संघातील खेळाडू आजारी असल्याचं समोर आलं आहे.
टीम इंडियाला या महत्त्वाच्या सामन्याआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा युवा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत आजारी असल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती उपकर्णधार शुबमन गिल याने पत्रकार परिषदेत दिली. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून केएल राहुल याला संधी दिली होती. पंतला पाकिस्तानविरुद्ध संधी मिळणार की नाही, हा नंतरचा मुद्दा. मात्र आता पंत आजारी आहे. त्यामुळे पंत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नसणार हे स्पष्ट झालं आहे.
टीम इंडियाला टेन्शन कशामुळे?
ऋषभ पंत हा बॅकअप विकेटकीपर आहे. पंत आजारी झाल्याने विकेटकीपर म्हणून आता केएल हाच एकमेव आहे. आता पंत लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता प्रार्थना करतोय. मात्र अशात केएल राहुलला काय झालं, तर टीम इंडियासाठी ते तापदायक असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.
