Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NZ : विल यंगनंतर टॉम लॅथमचा शतकी झंझावात, स्टीफन फ्लेमिंगच्या विक्रमाची बरोबरी

Tom Latham Century : न्यूझीलंडची अडखळत सुरुवात झाली. मात्र विल यंगनंतर टॉम लॅथम याने शतकी खेळी केली. टॉमने शतकासह माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

PAK vs NZ : विल यंगनंतर टॉम लॅथमचा शतकी झंझावात, स्टीफन फ्लेमिंगच्या विक्रमाची बरोबरी
Tom Latham CenturyImage Credit source: blackcaps x account
Follow us
| Updated on: Feb 19, 2025 | 6:39 PM

न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अप्रतिम सुरुवात केली आहे. न्यूझीलंडच्या 2 फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात नॅशनल क्रिकेट स्टेडियम, कराची येथे सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ओपनर विल यंग याच्यानंतर आता टॉम लॅथम याने शतक झळकावलं आहे. टॉमने या शतकी खेळीसह माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तसेच टॉम या स्पर्धेत शतक करणारा एकूण दुसरा आणि न्यूझीलंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात शतक करणारा न्यूझीलंडचा पाचवा फलंदाज ठरलाय.

स्टीफन फ्लेमिंगच्या विक्रमाची बरोबरी

टॉम लॅथम याने 47 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत शतक पूर्ण केलं. टॉमने 95 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. टॉमच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं. टॉमने यासह माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याच्या 8 एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली. टॉमआधी विल यंग यानेने 107 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. विल यंग याचं हे कारकीर्दीचील चौथं शतक ठरलं.

हे सुद्धा वाचा

न्यूझीलंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक करणारा पाचवा

दरम्यान टॉम लॅथम याने या शतकासह मानाच्या यादीत स्थान मिळवलंय. टॉम चॅम्पियन्स ट्रॉफीत शतक करणारा न्यूझीलंडचा पाचवा फलंदाज ठरला. न्यूझीलंडसाठी याआधी विल यंग, केन विलियमसन, ख्रिस केर्न्स आणि नॅथन एस्टल या चौघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडसाठी शतक केलंय.

लॅथमचं 21 वं आंतरराष्ट्रीय शतक

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, ​​केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्के.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.