Icc Champions Trophy : शतकवीर शुबमन, गिलकडून माजी कर्णधारासह केएलला झटका, दोघांचा रेकॉर्ड ब्रेक
Shubman Gill Maiden Century In Icc Champions Trophy 2025 : शुबमन गिल याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत अप्रतिम पदार्पण केलं. शुबमनने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अवघ्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियात अनेक अनुभवी खेळाडू असूनही शुबमन गिल याला उपकर्णधार करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र काही दिवसांतच शुबमनने निवड समितीचा निर्णय सार्थ ठरवला. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताला विजयी करण्यात शुबमन गिल याने निर्णायक भूमिका बजावली. बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना शुबमनने नाबाद शतक झळकावलं. शुबमनचा हा चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिलावहिला सामना होता. शुबमनने या पदार्पणातील सामन्यात शतक करत टीम इंडियाचा विजय सोपा केला.
शुबमनने 125 बॉलमध्ये 80 च्या स्ट्राईक रेटने 100 रन्स केल्या. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं. शुबमनने यासह माजी कर्णधारासह विद्यमान सहकारी अशा दोघांना मागे टाकलं. शुबमनने मोहम्मद अझरुद्दीन आणि केएल राहुल या दोघांना पछाडलं. शुबमनने अझरुद्दीन आणि केएल या दोघांचा एकदिवसीय क्रिकेटमधील 7 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला.
शुबमनची विजयी खेळी
दरम्यान 229 धावांचा पाठलाग करताना रोहित, विराट, श्रेयस आणि अक्षर या चौघांच्या रुपात टीम इंडियाने विकेट गमावले. अक्षर आऊट झाल्याने टीम इंडियाची 4 बाद 144 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर केएल आणि शुबमन या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद भागीदारी केली आणि टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. शुबमनने 129 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 101 रन्स केल्या. तर केएल राहुल याने 47 चेंडूत 41 धावांची नाबाद खेळी केली.
शुबमनचा शतकी तडाखा
Leading the chase ✅ Hundred ✅ Win ✅
Vice Captain Shubman Gill guides #TeamIndia to victory 👏
Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/YbWSCERX6E
— BCCI (@BCCI) February 20, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.
