AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला सपोर्ट करायला दुबईला जाताय? ‘या’ ठिकाणांनाही भेट द्या

दुबई हे एक सुंदर आणि आधुनिक शहर आहे. हे आश्चर्यकारक आर्किटेक्चर, लक्झरी शॉपिंग आणि अद्वितीय संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. दुबई जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. तुम्हीही इथे जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला सपोर्ट करायला दुबईला जाताय? 'या' ठिकाणांनाही भेट  द्या
dubai
| Edited By: | Updated on: Feb 18, 2025 | 12:38 AM
Share

दुबई हे जगभरातील अनेकांचे सर्वात आवडते हॉलिडे डेस्टिनेशन आहे. येथे उंच इमारती, शॉपिंग मॉल्स, समुद्र, वाळवंट, ॲडवेंचर आणि बेटांसह अशी अनेक आकर्षण ठिकाणं आहेत. तर दुसरीकडे 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सर्व सामने दुबईमध्येच खेळवले जाणार आहेत. अशातच जर तुम्ही टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी दुबईला जात असाल, तर दुबई सारख्या ड्रीम शहरात तुम्ही अशी अनेक ठिकाणं आहेत जी मस्त एक्सप्लोर करू शकता. तसेच या सुंदर ठिकाणी तुम्ही एकटे असाल किंवा तुमच्या जोडीदारासोबत तसेच मित्रांसोबत किंवा तुमच्या कुटुंबासोबत येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणं नक्कीच आहे. तर या लेखातून आम्ही तुम्हाला दुबईच्या संपूर्ण ट्रिपबद्दल सांगणार आहोत…

बुर्ज खलिफा

दुबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बुर्ज खलिफा, जी जगातील सर्वात उंच इमारत असल्याची नोंद झालेली आहे. तर या इमारतीची उंची सुमारे 828 मीटर आहे, ज्यामध्ये एकूण 160 मजले आहेत. तर या बुर्ज खलिफाच्या 124व्या आणि 148व्या मजल्यावर एक Observation Deck आहे, जिथून तुम्ही दुबई शहराचे 360 डिग्रीने संपूर्ण दृश्य पाहू शकता. तसेच तिथे एक नेत्रदीपक असा लाईट आणि संगीत शो देखील तुम्हाला पाहायला मिळेल.

दुबई मॉल

हा जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे. मॉलमध्ये एक्वैरियम, आइस-स्केटिंग पार्क, 100 फूड जॉइंट्स आणि इनडोअर थीम पार्क आहे. तसेच जो कोणी पर्यटक दुबईला येतो तो या मॉलला नक्की भेट देतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा या मॉलला भेट द्या.

दुबई डेझर्ट सफारी

जर तुम्ही दुबईत असाल तर येथील डेझर्ट सफारीचा आनंद घ्यायला विसरू नका. दुबईत वाळूच्या ढिगाऱ्यावर सँडबोर्ड, जीप आणि जिप्सी तसेच उंट सफारीचा आनंद घेऊ शकता. दुबई मधील हा क्षण तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा असेल. निश्चितच दुबईचे हे ठिकाण पर्यटनाचे ट्रम्पकार्ड आहे.

पाम जुमेरा

पाम जुमेरा हे एक कृत्रिम बेट आहे. हे ठिकाण लक्झरी रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘Atlantis The Palm’ नावाचा एक रिसॉर्ट येथे आहे, जो भव्यता आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो.

दुबईला कसे जायचे?

तुम्हाला दुबईला जाण्यासाठी फ्लाईटने जावे लागते. तुम्ही दुबईला जाण्यासाठी जर आधीच फ्लाइट बुक केली तर तुम्हाला रिटर्न तिकिटाचा खर्च 20,000 ते 35,000 रुपये होऊ शकतो. पण वेळेवर बुक न केल्यास तुमच्या खिशावर ताण पडू शकतो. तसेच भारतीय नागरिक म्हणून तुम्ही दुबईमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हल देखील घेऊ शकतात. तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि यूके किंवा यूएस व्हिसा असल्यास, तुम्ही दुबईला पोहोचल्यानंतर तुमचा व्हिसा मिळवू शकता. मात्र हे लक्षात ठेवा की, हा व्हिसा केवळ 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी वैध असेल. व्हिसाची किंमत सरासरी १२० दिरहम भारतीय चलनानुसार अंदाजे 2100 आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.