AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना केव्हा?

T20i World Cup 2026 Schedule : क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जाणून घ्या पहिला आणि अंतिम सामना केव्हा?

T20i World Cup 2026 : आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना केव्हा?
T20i World Cup 2026 ScheduleImage Credit source: TV9 Bharatvarsh
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 25, 2025 | 9:01 PM
Share

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीला होणार आहे. तर अंतिम सामन्याचा थरार हा 8 मार्च रोजी रंगणार आहे. साखळी फेरीत दररोज 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 7 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने असणार आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे.  स्पर्धेतील सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर एका गटातील 2 अव्वल संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सुपर 8 मधील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

20 संघ आणि 4 गट

ए ग्रुप : टीम इंडिया, यूएसए, नामिबिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तान,

बी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिंबाब्वे आणि ओमान

सी ग्रुप :  इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली

डी ग्रुप : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि यूएई

एकूण 8 शहरांत वर्ल्ड कप सामने

वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने एकूण 7 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. भारतातील 5 तर श्रीलंकेतील 2 शहरांत हे सामने खेळवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी दिली. भारतात मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये वर्ल्ड कप सामने होणार आहेत. तर श्रीलंकेत 2 शहरांतील 3 स्टेडियममध्ये क्रिकेट सामने होणार आहेत.

अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली

इडन गार्डन्स, कोलकाता

एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

वानखेडे स्टेडियम, मुंबई

श्रीलंकेतील 3 स्टेडियम कोणते?

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी

आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो

सिंहलीस स्पोर्ट्स क्लब, कोलंबो

वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना 15 फेब्रुवारीची प्रतिक्षा असणार आहे.  भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाचं वेळापत्रक

भारत विरुद्ध अमेरिका, 7 फेब्रुवारी, मुंबई

भारत विरुद्ध नामिबिया, 12 फेब्रुवारी, दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 फेब्रुवारी, कोलंबो

भारत विरुद्ध नेदरलँड्स, 18 फेब्रुवारी, अहमदाबाद

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 20 संघ

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे, आयर्लंड, ओमान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई आणि कॅनडा.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?