
आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीला होणार आहे. तर अंतिम सामन्याचा थरार हा 8 मार्च रोजी रंगणार आहे. साखळी फेरीत दररोज 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सलामीचा सामना हा 7 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने असणार आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. स्पर्धेतील सहभागी 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला प्रत्येकी 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर एका गटातील 2 अव्वल संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सुपर 8 मधील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
ए ग्रुप : टीम इंडिया, यूएसए, नामिबिया, नेदरलँड्स आणि पाकिस्तान,
बी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिंबाब्वे आणि ओमान
सी ग्रुप : इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली
डी ग्रुप : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि यूएई
वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने एकूण 7 शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. भारतातील 5 तर श्रीलंकेतील 2 शहरांत हे सामने खेळवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी दिली. भारतात मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये वर्ल्ड कप सामने होणार आहेत. तर श्रीलंकेत 2 शहरांतील 3 स्टेडियममध्ये क्रिकेट सामने होणार आहेत.
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
इडन गार्डन्स, कोलकाता
एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी
आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
सिंहलीस स्पोर्ट्स क्लब, कोलंबो
वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक
The schedule for ICC Men’s @T20WorldCup 2026 is here! 📅
The matches and groups were unveiled at a gala event in Mumbai led by ICC Chairman @JayShah, and with new tournament ambassador @ImRo45 and Indian team captains @surya_14kumar and Harmanpreet Kaur in attendance.
✍️:… pic.twitter.com/fsjESpJPlE
— ICC (@ICC) November 25, 2025
टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना 7 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना 15 फेब्रुवारीची प्रतिक्षा असणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारत विरुद्ध अमेरिका, 7 फेब्रुवारी, मुंबई
भारत विरुद्ध नामिबिया, 12 फेब्रुवारी, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 फेब्रुवारी, कोलंबो
भारत विरुद्ध नेदरलँड्स, 18 फेब्रुवारी, अहमदाबाद
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे, आयर्लंड, ओमान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई आणि कॅनडा.