WTC Final मधील खेळीमुळे जसप्रीतला मोठे नुकसान, अडीच वर्षानंतर ओढवली ‘ही’ परिस्थिती

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सने नमवत जेतेपद मिळवले. या विजयामुळेच न्यूझीलंड क्रिकेटसंघाने (New Zealand Cricket Team) आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र या क्रमवारीत मोठे नुकसान झाले आहे.

WTC Final मधील खेळीमुळे जसप्रीतला मोठे नुकसान, अडीच वर्षानंतर ओढवली 'ही' परिस्थिती
जसप्रीत बुमराह
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 01, 2021 | 2:04 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) आयसीसी कसोटी क्रमवारी (ICC World Test Ranking) नुकतीच जाहिर केली. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर (WTC Final) या क्रमवारीत मोठे फेरबदल झाले आहेत. न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाला आणि खेळाडूंनी क्रमवारीत चांगली मुसंडी मारली आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघासह, कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) अंतिम सामन्यात एकही विकेट न घेणे चांगलेत महाग पडले असून त्याच्या कसोटी क्रमवारीत मोठा उतार झाला आहे. (ICC New Tesst Rankings Revealed In Bowling Rankings Jasprit Bumrah Down To 19th Place Lowest since his Debut)

जसप्रीत बुमराह टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्याआधी कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत 11 व्या स्थानावर होता. पण अंतिम सामन्यात एकही विकेट न घेता आल्याने त्याच्या क्रमवारीत कमालीचा उतार होऊन तो थेट 19 व्या स्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे अडीच वर्षानंतर अर्थात जानेवारी 2019 नंतरची बुमराहची ही सर्वात खराब रँकिग आहे. 2018 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर बुमराहचे प्रदर्शन कायम चांगले होते. मात्र या एका सामन्यामुळे त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. 2020 वर्षांत बुमराहने 8 कसोटी सामन्यांत 21 विकेट्स घेतले आहेत.

पुन्हा वर येण्याची संधी

जसप्रीत बुमराहला आपली टेस्ट रँकिग सुधारण्याची संधी काही महिन्यांवर आलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे.  पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत चांगले प्रदर्शन केल्यास बुमराह पुन्हा आयसीसी कसोटी क्रमवारीत वरच्या स्थानी झेप घेऊ शकतो. बुमराह व्यतीरिक्त भारताचा गोलंदाज इशांत शर्माला (Ishant Sharma) मात्र WTC Final मधील कामगिरीचा फायदा झाला त्याने 16 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

हे ही वाचा –

ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर

एका अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली ‘या’ स्थानावर

ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?

(ICC New Test Rankings Revealed In Bowling Rankings Jasprit Bumrah Down To 19th Place Lowest since his Debut)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें