AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Ranking : विराट कोहली-रोहित शर्माला वनडे रँकिगमध्ये मोठा फायदा

आयसीसीने जारी केलेल्या वनडे रँकिंगमध्ये (Icc Odi Ranking) टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) खेळाडूंना मोठा फायदा झालाय.

Icc Ranking : विराट कोहली-रोहित शर्माला वनडे रँकिगमध्ये मोठा फायदा
| Updated on: Jan 11, 2023 | 5:35 PM
Share

Virat Kohli Icc Odi Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International Cricket Council) अर्थात आयसीसीने वनडे रँकिंग जारी केली आहे. या आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाची ‘रनमशीन’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली (Virat Kohli) याला मोठा फायदा झाला आहे. विराटने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केली होती. विराटला या शतकी खेळीचा रँकिगमध्ये 2 स्थानांनी फायदा झाला आहे. (icc odi rannking team india virat kohli 6th position in batsman ranking rohit sharma and mohammed siraj ind vs sl odi series)

विराटने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 113 धावांची खेळी केली. विराटचं एकदिवसीय कारकीर्दीतील हे 45 व शतक ठकलं या खेळीमुळे विराट फलंदाजांच्या क्रमवारीत 8 व्या स्थानावरुन 6व्या स्थानी आला आहे.

रोहित शर्मा चमकला

विराटसोबत कर्णधार रोहित शर्माच्या आकड्यातही सुधारणा झाली आहे. रोहितला एका स्थानाचा फायदा झालाय. त्यामुळे विराट 9 व्या क्रमांकावरुन 8 व्या स्थानी आला आहे. विराट आणि रोहित या 2 भारतीय फलंदाजांचाच टॉप 10 बॅटरच्या यादीत समावेश आहे. रोहितने श्रीलंका विरुद्ध पहिल्या वनजेत 83 रन्स केल्या होत्या. हिटमॅनने या खेळीत 9 चौके आणि 3 सिक्स लगावले होते. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 67 धावांनी विजय मिळवला.

पहिल्या क्रमांकावर कोण?

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. बाबरच्या नावावर 891 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा रसी वान डेर डुसे हा 766 रेटिंग्ससह दुसऱ्या, इमाम उल हक तिसऱ्या, क्विंटन डी कॉक चौथ्या आणि डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानी विराजमान आहे.

मोहम्मद सिराजचा भेदक मारा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला चांगल्या गोलंदाजीचं बक्षिस मिळालंय. सिराजने थेट 4 स्थानांची झेप घेतलीय. सिराज यासह आता 22 व्या क्रमांकावरुन थेट 18 व्या स्थानी पोहचलाय. सिराजने श्रीलंका विरुद्ध 7 ओव्हरमध्ये 30 धावा देत 2 महत्त्वाचे विकेट्स घेतल्या. सिराजने अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिसला आऊट केलं होतं.

टीम इंडिया मालिकेत आघाडीवर

दरम्यान टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता मालिकेतील दुसरा सामना हा कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळणार आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर श्रीलंकेसाठी हा करो या मरोचा सामना आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात काय होतं, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळतेय.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.