SL vs NED: नेदरलँड्सला विजयासह नशिबाची साथ गरजेची, नेपाळची कामगिरी निर्णायक ठरणार

Sri Lanka vs Netherlands Super 8 Scenario T20 World Cup 2024: नेदरलँड्सला 3 सामन्यांमधील 2 पराभवानंतरही सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी, जाणून घ्या समीकरण.

SL vs NED: नेदरलँड्सला विजयासह नशिबाची साथ गरजेची, नेपाळची कामगिरी निर्णायक ठरणार
Sri Lanka vs Netherlands
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 11:03 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आतापर्यंत एकूण 6 संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर 10 संघांचा स्पर्धेतून बाजार उठला आहे. तर 4 संघांमध्ये अजूनही 2 जागांसाठी चुरस आहे. आता सुपर 8 साठी लवकरच उर्वरित 2 संघ निश्चित होतील. या स्पर्धेतील 38 व्या सामन्यात डी ग्रुपमधील श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने असणार आहे. श्रीलंकेचं आव्हान हे संपुष्टात आलंय. मात्र नेदरलँड्ससाठी हा सामना महत्त्वाचा आहे. डी ग्रुपमधून आधीच दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. तर नेपाळचंही पॅकअप झालंय. त्यामुळे नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात सुपर 8 च्या 1 जागेसाठी जोरदार चुरस आहे.

बांगलादेशने 3 पैकी 2 सामने जिंकलेत. त्यांचे 4 गुण आहेत. तर नेदरलँड्सने 3 पैकी केवळ 1 सामना जिंकलाय. मात्र त्यानंतरही नेदरलँड्सला शेवटचा सामना जिंकून सुपर 8 मध्ये पोहचण्याची संधी आहे. मात्र नेदरलँड्सला त्यासाठी नेपाळची साथ आवश्यक आहे. कारण बांगलादेश आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा उर्वरित 1 सामना हा मागोमाग आहे. नेदरलँड्सला सुपर 8 मध्ये पोहचण्यासाठी श्रीलंके विरुद्ध विजय मिळवावा लागेल. इतकंच नाही, तर नेपाळने बांगलादेशवर मात केली तरच नेदरलँड्सला सुपर 8 मध्ये पोहचता येईल. त्यामुळे नेदरलँड्सचं सुपर 8 चं गणित हे जरतरचं आहे. त्यामुळे आता नेपाळच्या कामगिरीकडे नेदरलँड्सचं लक्ष असणारच आहे. त्यासोबत दुसऱ्या बाजूला नेदरलँड्सला श्रीलंकेवरही विजय मिळवावा लागेल. आता नेदरलँड्सचं काय होतं? हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल.

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, कायल क्लेन, लोगान वॅन बीक, मैक्स ओ’डोड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल , विक्रम सिंह आणि वेस्ले बर्रेसी.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम : वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (विकेटकीपर), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुनीथ नुशमान वेललागेरा, दुनीथ नुशमान चॅलेरा, नुशमन चॅलेस, मथीशा पथीराना आणि दिलशान मदुशंका.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.