AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Super 8 Schedule: टीम इंडियाच्या सुपर 8 चं वेळापत्रक, पहिला सामना केव्हा?

T 20 World Cup 2024 Super 8: टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यांना 19 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने आपण भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक जाणून घेऊयात.

Team India Super 8 Schedule: टीम इंडियाच्या सुपर 8 चं वेळापत्रक, पहिला सामना केव्हा?
Team India
| Updated on: Jun 19, 2024 | 12:15 AM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 17 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुपर 8 साठी संघ निश्चित झाले. श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या मातब्बर संघांचं आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं. तर दुसऱ्या बाजूला अगदी नवख्या असलेल्या यूएसए या संघाने पहिल्याच झटक्यात सुपर 8चं तिकीट मिळवलं. साखळी फेरीत अनेक उलटफेर पाहायला मिळाले. आता क्रिकेट चाहते हे सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाले आहेत. सुपर 8 फेरीत एकूण 8 संघांमध्ये 12 सामने होणार आहे. एकूण 4 स्टेडियममध्ये हे सामने पार पडणार आहेत. बुधवार 19 जूनपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होत आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियाच्या सुपर 8 सामन्यांच वेळापत्रक जाणून घेऊयात.

सुपर 8 मध्ये पोहचलेल्या संघांना 2 गटात विभागण्यात आलंय. ए आणि बी या 2 गटात प्रत्येकी 4 संघ आहेत. प्रत्येक गटातील संघ आपल्या इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात 19 जून रोजी यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहे. तर टीम इंडिया सुपर 8 मधील मोहिमेची सुरुवात ही अफगाणिस्तान विरुद्ध करणार आहे. टीम इंडियाचे तिन्ही सामने हे 1 दिवसाच्या अंतराने आहेत. तसेच टीम इंडियाचे सामने हे एकाच वेळेस रात्री 8 वाजता ठेवण्यात आले आहेत.

टीम इंडिया पहिला सामना हा अफगाणिस्तान, दुसरा सामना बांगलादेश तर तिसरा आणि अखेरचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियासाठी पहिल्या 2 सामन्यांच्या तुलनेत तिसरा सामना हा आव्हानात्मक असणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये अद्याप अफगाणिस्तानला एकदाही जिंकता आलेलं नाही. तसेच टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध वरचढ राहिली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धही टीम इंडियाचाच बोलबाला आहे. मात्र सध्या सामने हे वेस्ट इंडिजमध्ये आहेत. त्यामुळे काय होईल, हे आत्ताच सांगणं धाडसाचं ठरेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुपर 8 मध्ये चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

विरुद्ध अफगाणिस्तान, 20 जून, केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस

विरुद्ध बांगलादेश, 22 जून, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 24 जून, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया

सुपर 8 साठी पात्र संघ

ग्रुप ए: टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश.

ग्रुब बी: दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, यूएसए आणि इंग्लंड.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.