पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम फुल फॉर्म मध्ये, पुन्हा एकदा विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar Azam) सध्या करीयरच्या सर्वोच्च फॉर्म मध्ये आहे. पुरुषांच्या आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये त्याने एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम फुल फॉर्म मध्ये, पुन्हा एकदा विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला
babar azam-virat kohli
Image Credit source: icc
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 29, 2022 | 4:18 PM

मुंबई: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar Azam) सध्या करीयरच्या सर्वोच्च फॉर्म मध्ये आहे. पुरुषांच्या आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये त्याने एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टी 20 क्रिकेटच्या (T20 Cricket) आयसीसी रॅकिंगमध्ये सर्वोच्च काळ अव्वल स्थानावर रहाण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. बाबर आझमने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा  (Virat kohli) मागच्या दशकातील 1013 दिवस टी 20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर रहाण्याचा विक्रम मोडला. 818 रेटिंग पॉइंटसह बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तानचाच विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान 794 रेटिंग पॉइंटसह दुसऱ्यास्थानावर आहे. यावर्षी बाबर आझमने एकमेव टी 20 सामना खेळला. त्यात त्याने 46 चेंडूत 66 धावा फटकावल्या. मागच्यावर्षी त्याने 29 सामन्यात 939 धावा केल्या. यूएईमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्यफेरी पर्यंत पोहोचवण्यात बाबर आझमची महत्त्वाची भूमिका होती.

विराट टॉप 20 मध्येही नाही

विराट कोहली आयसीसीच्या टी 20 क्रमवारीत 21 व्या स्थानावर आहे. यावर्षी विराट फक्त दोन टी 20 सामने खेळला आहे. विराटचा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये संघर्ष सुरु आहे. त्याच्या बॅट मधून धावा जणू आटल्या आहेत. विराटला सूर कधी गवसणार? हाच क्रिकेट चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे. मागच्या दोन वर्षात त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही.

इशान किशनच्या क्रमवारीत घसरण

इशान किशनच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. तो 6 व्या क्रमांकावरुन सातव्या स्थानावर आला आहे. इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपलेल्या टी 20 सीरीजमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने दोन अर्धशतकं झळकावली. पण आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें