IND vs NAM : नामिबियाचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून धुलाई फिक्स! बुमराहचं कमबॅक

T20i World Cup 2026, India vs Namibia Toss Result : टीम इंडिया विरुद्ध नामिबिया या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. दोन्ही संघात प्रत्येकी 2-2 बदल केले गेले आहेत.

IND vs NAM : नामिबियाचा फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून धुलाई फिक्स! बुमराहचं कमबॅक
India vs Namibia Toss
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Feb 12, 2026 | 7:05 PM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध नामिबिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील दुसरा सामना आहे. भारताने या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. तर नामिबियाची पराभवाने सुरुवात झालीय. आता भारत-नामिबियातील सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला.

नामिबियाचा चेस करणार

नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. नामिबियाच्या कर्णधाराने घेतलेल्या निर्णयाने भारताला फलंदाजाची संधी मिळाली आहे. त्यामुळे नामिबियाच्या गोलंदाजांची धुलाई निश्चित समजली जात आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात 300 पार मजल मारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांकडून बदल

नामिबिया आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारतीय संघात 2 अपेक्षित बदल करण्यात आले आहेत. भारताच्या प्रमुख गोलंदाजांचं कमबॅक झालं आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याचं कमबॅक झाल्याने मोहम्मद सिराज याला बाहेर बसावं लागलं आहेत. तर अभिषेक शर्मा याला तब्येतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे संजू सॅमसन याला संधी देण्यात आली आहे. संजूच्या एन्ट्रीमुळे ओपनिंग जोडी बदलली आहे. इशान आणि संजू हे दोघे ओपनिंग करणार आहेत. तर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला कमबॅकसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

नामिबियाकडून 2 बदल

तसेच नामिबियाने टीम इंडिया प्रमाणे प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. नामिबियाचा हा निर्णय किती योग्य ठरतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन(विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

नामिबिया प्लेइंग ईलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड शॉल्ट्ज, बेन शिकोंगो आणि मॅक्स हेंगो.