NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका विजयी हॅट्रिकसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?

NZ vs SA, Icc T20i World Cup 2026 : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र शनिवारी या दोघांपैकी कोणत्या तरी एका संघाचा पराभव होणार हे निश्चित आहे.

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका विजयी हॅट्रिकसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?
New Zealand vs South Africa
Image Credit source: @BLACKCAPS and @ProteasMenCSA X Account
| Updated on: Feb 14, 2026 | 3:35 AM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शनिवारी 14 फेब्रुवारीला साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान अशी लढत पाहायला मिळणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड स्कॉटलंड विरुद्ध खेळणार आहे. दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 8 साठी पात्र ठरेल. या तिन्ही सामन्यांबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

आयर्लंड विरुद्ध ओमानपैकी कोण जिंकणार?

आयर्लंड आणि ओमान या दोघांचा हा तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांची विजयाची प्रतिक्षा अजून कायम आहे. दोन्ही संघांनी आपले पहिले 2 सामने गमावले आहेत. अशात आता शनिवारी एका संघाची विजयाची प्रतिक्षा संपणार आहे. तर एक संघाची पराभवाची हॅट्रिक पूर्ण होईल. आता कोणता संघ विजयाचं खातं उघडणार आणि कोण पराभवाची हॅट्रिक करणार? याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल.

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड

इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. स्कॉटलंड असोसिएट नॅशन आहे. मात्र इंग्लंड वर्ल्ड चॅम्पियन टीम आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना फार प्रतिष्ठेचा आणि स्पर्धेच्या हिशोबानेही फार महत्त्वाचा आहे. इंग्लंडला स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर स्कॉटलंड विरुद्ध विजय मिळवणं बंधनकारक आहे. इंग्लंडने हा सामना गमावला तर त्यांचं पॅकअप होईल. त्यामुळे इंग्लंड स्कॉटलंड विरुद्ध कशी कामगिरी करते हे निकालानंतर स्पष्ट होईलच. हा सामना दुपारी 3 वाजता सुरु होईल.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ शनिवारी या मोहिमेतील आपला तिसरा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत अजिंक्य आहेत. दोन्ही संघांना सलग तिसरा सामना जिंकण्याची समसमान संधी आहे. तसेच हा सामना जिंकणारा संघ सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ विजयी हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सामन्यातील पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजता टाकला जाईल.