
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडण्यासाठी सज्ज आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन कोणताही बदल केलेला नाही. तर टीम इंडियाने या सामन्यासाठी बदल केले आहेत.
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे संजू सॅमसन याला बाहेर व्हावं लगालं आहे. तर कोलंबोतील ही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असल्याने अर्शदीप सिंह याच्या जागी कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला एकमेव सामना जिंकता आला आहे. तर एकूणच टी 20i क्रिकेटमध्ये दोन्ही संघात एकूण 16 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 3 सामनेच जिंकता आले आहेत.
टीम इंडिया आणि पाकिस्तान हा सामना 1 विरुद्ध 6 अशी लढत आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20I रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 10 सामने जिंकले आहेत. भारताने नामिबिया आणि त्याआधी यूएसएवर मात केली आहे. तर भारताने टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळलेले सर्व 8 सामने जिंकले होते.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानचे 11 खेळाडू : सलमान आगा (कॅप्टन), सॅम अयुब, साहिबजादा फरहान, बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अश्रफ, उस्मान खान (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारीक.