AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U 19 World Cup: एक नावाजलेली टीम फक्त 23 रन्सवर ऑलआऊट, 4 बॅट्समन 0 वर OUT

या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि झिम्बाब्वे दरम्यान सातवा सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लंडच्या महिला टीमने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये दमदार प्रदर्शन केलं.

U 19 World Cup: एक नावाजलेली टीम फक्त 23 रन्सवर ऑलआऊट, 4 बॅट्समन 0 वर OUT
Cricket match
| Updated on: Jan 16, 2023 | 8:51 AM
Share

डरबन: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC ने पहिल्यांदाच महिला अंडर 19 वर्ल्ड कपच आयोजन केल आहे. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि झिम्बाब्वे दरम्यान सातवा सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लंडच्या महिला टीमने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये दमदार प्रदर्शन केलं. खासकरुन इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. क्रिकेटमध्ये अशी कामगिरी फार कमीवेळा पहायला मिळते. या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने 176 धावांनी मोठा विजय मिळवला.

इंग्लंडने किती धावांच टार्गेट दिलं?

इंग्लंडच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी चार विकेट गमावून 199 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची संपूर्ण टीम अर्धशतकी मजलही गाठू शकली नाही. अवघ्या 23 रन्सवर झिम्बाब्वेची टीम ऑलआऊट झाली. इंग्लंडच्या टीमने फक्त 12 ओव्हर्समध्ये झिम्बाब्वेच्या टीमला ऑलआऊट करुन विशाल विजय मिळवला.

किती जणांनी दोन आकडी धावा केल्या?

इंग्लंडच्या टीमने मजबूत धावसंख्या उभारली. इंग्लंडने उभारलेला लक्ष्य पाहता झिम्बाब्वेचा विजय अशक्य होता. झिम्बाब्वेची टीम इंग्लंडला टक्कर देऊन निदान 100 पेक्षा जास्त धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा होती. पण असं होऊ शकलं नाही. झिम्बाब्वेचा कुठलाही बॅट्समन दोन आकडी धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही. टीमसाठी सर्वाधिक म्हणजे फक्त 5 धावा एडेल जिमुनूने केल्या. ती नाबाद राहिली. तवाननायशा मारुमानीने चार रन्स केल्या. कॅप्टन केलिस एनधोल्व 3 रन्सच्या पुढे जाऊ शकली नाही. चार बॅट्समन शुन्यावर आऊट झाले.

कोणी किती विकेट काढल्या?

इंग्लंडकडून ग्रेस स्क्रीवेंसने चार ओव्हरमध्ये 2 धावा देऊन चार विकेट काढल्या. तिने दोन मेडन ओव्हर टाकल्या. सोफिया स्माले आणि जोसी ग्रोव्सने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. एली एंडरसनला एक विकेट मिळाली. अशी होती इंग्लंडची इनिंग

इंग्लंडच्या टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. टीमच्या बॅट्समननी शानदार खेळ दाखवला. कॅप्टन ग्रेस आणि लिबर्टी हीपने टीमला दमदार सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. हीप 25 रन्स करुन आऊट झाली. ग्रेसने 45 धावा केल्या. निमाह हॉलंडने 37 चेंडूत सहा फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 59 धावा केल्या. चॅरिस पावेलीने 45 धावांच योगदान दिलं.

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.