AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup | पुढच्यावर्षी ‘या’ वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना नाही होणार, ICC चा मोठा निर्णय

World Cup | भारत विरुद्ध पाकिस्तान सामंन्याची प्रत्येकाला प्रतिक्षा असते. क्रिकेट विश्वाची या मॅचवर नजर असते. पुढच्यावर्षी श्रीलंकेत वर्ल्ड कप होणार आहे. यात ग्रुप स्टेजमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नाही होणार.

World Cup | पुढच्यावर्षी 'या' वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना नाही होणार, ICC चा मोठा निर्णय
Team India Image Credit source: BCCI
| Updated on: Sep 23, 2023 | 1:46 PM
Share

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सामन्याची प्रत्येकाला प्रतिक्षा असते. सगळ्या क्रिकेट विश्वाची या महामुकाबल्यावर नजर असते. या सामन्यांची तिकीट मिळवण्यासाठी मारामार असते. प्रेक्षक संख्येमध्ये हा सामना रेकॉर्ड ब्रेक ठरतो. त्यामुळे प्रत्येक क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दोन्ही देशांचा एकतरी सामना असतो. क्रिकेट वर्ल्ड कपच शेड्युल लागल्यानंतर ग्रुप स्टेजमध्ये भारत-पाकिस्तान सामना असतोच. पण पुढच्यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये असं होणार नाहीय. या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान एका ग्रुपमध्ये नाहीयत. त्यामुळे दोन्ही टीम्समध्ये ग्रुप स्टेजचा सामना होणार नाही. पुढच्यावर्षी 13 जानेवारीपासून श्रीलंकेत अंडर-19 वर्ल्ड कप होणार आहे. यासाठी आयसीसीने शेड्युल जाहीर केलय. या शेड्युलनुसार भारत-पाकिस्तान वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहेत. टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये विद्यमान विजेता संघ म्हणून उतरणार आहे. मागच्यावर्षी यश ढुलच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता.

टीम इंडिया या वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मध्ये आहे. भारतासोबत बांग्लादेश, आयर्लंड आणि अमेरिका या टीम आहेत. टीम इंडिया 14 जानेवारीला बांग्लादेश विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 18 जानेवारी अमेरिकेविरुद्ध सामना आहे. 20 जानेवारीला भारताचा सामना आयर्लंड विरुद्ध आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 16 टीम्स आहेत. चार-चारच्या ग्रुपमध्ये टीम्सची विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि ग्रुप सी मध्ये में ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या टीम आहेत. ग्रुप-डी मध्ये अफगानिस्तान, पाकिस्तान, न्यूजीलंड आणि नेपाळ या टीम आहेत. वर्ल्ड कपचा फॉर्मेट कसा आहे?

प्रत्येक ग्रुपमधील टॉप 3 टीम पुढच्या फेरीत पोहोचतील. या राऊंडला सुपर-6 म्हटलं जाईल. 12 टीम्सची 6-6 अशी दोन गटात विभागणी करण्यात आलीय. ग्रुप ए आणि डी चा मिळून एक ग्रुप बनेल. ग्रुप बी आणि सी चा मिळून एक ग्रुप होईल. सुपर-6 मधून टॉप-2 टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील. फायनल 4 फेब्रुवारीला होईल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.