AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 World Cup | पहिल्याच सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान भिडणार, वर्ल्ड कपमधील हायव्होल्टेज सामना

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला अवधे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेत टीम इंडिया पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

T 20 World Cup | पहिल्याच सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान भिडणार, वर्ल्ड कपमधील हायव्होल्टेज सामना
| Updated on: Feb 08, 2023 | 1:21 PM
Share

केपटाऊन : टीम इंडिया आणि पाकिस्तान, 2 पारंपरिक चीर प्रतिद्वंदी कट्टर प्रतिस्पर्धी. दोन्ही देशातील ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ही खऱ्या अर्थाने पर्वणी असते. दक्षिण आफ्रिकेत वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत 2 कडवट प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. दोन्ही संघासाठी हा सामना म्हणजे वर्ल्ड कपपेक्षा महत्त्वाचा. दोन्ही टीमसाठी या सामन्यात विजय मिळवणं हे प्रतिष्ठेचं आहे, मात्र जिंकणार कुणीतरी एकच टीम. मात्र या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रंगत, थरार असं सर्व काही पाहायला मिळणार आहे. कारण आतापर्यंत उभयसंघात थरारक सामने झाले आहेत.

या वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. एकूण 10 संघ वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत. म्हणजेच एका वर्ल्ड कपसाठी 10 संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एकूण 17 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. तर 23 सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच अंतिम सामना हा 26 फेब्रुवारीला पार पडणार आहे.

टीम इंडियाला गेल्या टी 20 वर्ल्ड कपने हुलकावणी दिली होती. टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरली आहे. तसेच टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाची प्रबळ दावेदार आहे.

10 टीम 2 ग्रुप

स्पर्धेतील एकूण 10 संघाना प्रत्येकी 5 टीम यानुसार 2 गटात विभागलं आहे. टीम इंडिया, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि विंडिज या 5 टीम ग्रुप बी मध्ये आहे. तर ए ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. प्रत्येक ग्रुपमधील टीम उर्वरित 4 संघाविरुद्ध 1 मॅच खेळणार आहे. तर दोन्ही ग्रुपमधील पहिल्या 2 टीम्स या सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 12 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध विंडिज, 15 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 20 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

हरमनप्रीत कौर (कर्णधार), हार्लीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग आणि शिखा पांडे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.