World Cup 2023 | पावसामुळे सामना रद्द झाल्यास विजयी कोण? आयसीसीचा नियम माहितीय?
Icc World Cup 2023 Rain | आशिया कप स्पर्धेत काही सामने हे पावसामुळे रद्द करण्यात आले. आत तीच तऱ्हा आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील मुख्य सामन्यात पावसामुळे सामना रद्द झाला तर काय?

मुंबई | आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून होत आहे. त्याआधी 4 ऑक्टोबरला ओपनिंग सेरमनीचा कार्यक्रम पार पडणार आहे. वर्ल्ड कपमध्ये 45 दिवसांमध्ये 10 ठिकाणी 48 सामने होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध 9 सामने खेळणार आहे. साखळी फेरीनंतर 2 सेमी फायनल सामने होतील. तर त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महाअंतिम सामना पार पडेल.
या वर्ल्ड कपआधी सराव सामने खेळवले जात आहे. या सराव सामन्यांमध्ये पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे अनेक सामने रद्द करावे लागेल. टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्धचा पहिला सराव सामना हा पावसामुळेच रद्द करण्यात आला. त्यामुळे आता वर्ल्ड कपमधील मुख्य स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणता संघ विजेता ठरणार? याबाबत आयसीसीने काय नियम केले आहेत का, हे आपण समजून घेऊयात.
वर्ल्ड कप स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने साखळी फेरीतील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळे जर पावसामुळे साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. आता तुम्ही म्हणाल की सेमी फायनल आणि फायनल सामन्यांमध्ये पाऊस झाला तर काय? याबाबतही आपण जाणून घेऊयात.
राखीव दिवस
सेमी फायनल आणि फायनलमध्ये 4 संघ फार मेहनतीने पोहचतील. त्यामुळे या निर्णायक सामन्यात पावसाने खोडा घातलाच तर त्यावर आयसीसीकडे जालमी उपाय आहे. आयसीसीने या 3 महत्त्वाच्या सामन्यांसाठी राखील दिवस ठेवला आहे. पहिला सेमी फायनल सामना हा 15 नोव्हेंबरला मुंबई आणि दुसरा कोलकाता इथे होणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना पार पडणार आहे. या अंतिम सामन्यासाठी 20 नोव्हेंबर हा रिझर्व्ह डे आहे.
पहिला सामना केव्हा?
दरम्यान वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर 14 ऑक्टोबरला याच स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. वर्ल्ड कपमधील दिवसाचे सामना सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तर डे नाईट मॅचला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.
