AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामना सुरु असताना अंपायरच्या तळपायाची आग मस्तकात, बंदूक काढून गोळ्या झाडल्या! Live मॅचमध्ये राडा

भारतीय पंच अनिल चौधरी सध्या चर्चेत आहेत. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेल्या खुलाशामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी एका घटनेचा उल्लेख करताना सांगितलं की, पंचांनी लाईव्ह सामन्यात गोळ्या झाडल्या होत्या. नेमकं काय झालं ते पुढे जाणून घेऊयात

सामना सुरु असताना अंपायरच्या तळपायाची आग मस्तकात, बंदूक काढून गोळ्या झाडल्या! Live मॅचमध्ये राडा
Image Credit source: (प्रातिनिधीक फोटो- Getty Images)
| Updated on: Jan 27, 2025 | 7:11 PM
Share

क्रिकेटमध्ये आतापर्यंत वाद झाल्याच्या अनेक घटना झाल्या आहेत. पंचांच्या निर्णयावर खेळाडूंनी भर मैदानात नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा नाबाद असतानाही पंचाच्या चुकीचा निर्णयाचा फटका खेळाडूंना बसला आहे. आता डीआरएस सिस्टम आहे. मात्र त्यातही पंचांनी फिल्डवर काय निर्णय दिला आहे तो महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अनेकदा खेळाडू आपल्या साहित्यावर राग व्यक्त करून निघून जातात. कोणी बॅट फेकतं, तर कोणी हेल्मेट फेकून राग व्यक्त करतं. पण भारताचा प्रसिद्ध पंच अनिल चौधरी यांनी सांगितलेला एक किस्सा ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. अनिल चौधरी हे आता आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि 2013 पासून बीसीसीआयसोबत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये घडलेल्या एका घटनेचा यात उल्लेख केला आहे. यात त्यांनी सांगितलं की पंचाने लाईव्ह सामन्यात बंदूक काढून गोळीबार केला होता. अनिल चौधरी यांच्या पडकास्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी उत्तर प्रदेशच्या एका स्पर्धेचा किस्सा सांगितलं. त्यात पंचांनी गोळीबार केल्याने सामना थांबवावा लागला होता.

अनिल चौधरी याने सांगितलं की, ‘मी युपीच्या एका स्पर्धेत पंच म्हणून गेलो होतो. तेव्हा आम्ही आयोजकांना विचारलं की, तुम्ही दिल्लीहून पंच का बोलवले आहेत. ही स्पर्धा तर लोकल आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की, जुन्या पंचाने गोळीबार केला होता. त्या सामन्यात युपीच्या रणजी संघातील काही खेळाडू खेळत होते. त्यांनी पंचांवर इतका दबाव टाकला की त्याला बंदूक काढून गोळीबार करावा लागला. त्यानंतर सामना बंद झाला. तेव्हा आयोजकांनी विचार केला की, इतके पैसे खर्च करून आपण स्पर्धा आयोजिक करतो तर थोडे पैसे देऊन दिल्लीहून पंचांना बोलवावं.’ अनिल चौधऱी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

अनिल चौधरी हे भारतातील सर्वात मोठे पंच आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात पंचगिरी करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 12 कसोटी, 469 वनडे आणि 64 टी20 सामन्यात पंच म्हणून भूमिका बजावली आहे. या शिवाय वुमन्स आंतरराष्ट्रीय सामन्यातही अनिल चौधरी यांनी पंच म्हणून भूमिका बजावली आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.