AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs LSG 2023 : नजर हटली, दुर्घटना घडली, Dinesh Karthik ची चूक RCB ला अशी भोवली, VIDEO

RCB vs LSG IPL 2023 : RCB चा लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. या पराभवासाठी दिनेश कार्तिकला जबाबदार धरलं जातय. त्याने अशी काय चूक केली?

RCB vs LSG 2023 : नजर हटली, दुर्घटना घडली, Dinesh Karthik ची चूक RCB ला अशी भोवली, VIDEO
RCB vs LSG IPL 2023Image Credit source: jio cinema
| Updated on: Apr 11, 2023 | 7:47 AM
Share

RCB vs LSG IPL 2023 : प्रवास करताना अनेकदा रस्त्यावर, हायवे वर बोर्ड लागलेले दिसतात. नजर हटली, दुर्घटना घडली, असा संदेश त्यावर लिहिलेला असतो. IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात अशीच दुर्घटना घडली. आरसीबीसोबत ही दुर्घटना घडली. दिनेश कार्तिकने सावधानता बाळगली नाही. जाणून घ्या नेमकं काय घडलं? सोमवारी आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये लखनौने आरसीबीवर एक विकेटने विजय मिळवला.

सामना टाय करण्याची आरसीबीकडे एक चांगली संधी होती. पण दिनेश कार्तिक चेंडू नीट पकडू शकला नाही. त्यामुळे लखनौला विजय मिळाला.

घरच्या मैदानात अशी हरली RCB

लखनौच्या टीमला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 रन्स हवा होता. स्ट्राइकवर आवेश खान होता. हर्षल पटेलने आवेश खानला चकवलं. चेंडू विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या हातात गेला. त्या गडबडीच्या क्षणात दिनेश कार्तिक चेंडू नीट पकडू शकला नाही. चेंडू त्याच्या हातातून निसटला. नॉन स्ट्राइकवर रवी बिश्नोईने धाव पूर्ण केली. अशा प्रकारे आरसीबीचा आपल्याच घरात पराभव झाला.

दिनेश कार्तिकने काय चूक केली?

दिनेश कार्तिककडे आयपीएलच्या 232 सामन्याचा अनुभव आहे. पण दबावाखाली मोठ-मोठे खेळाडू बिथरतात. या खेळाडू सोबत असंच काहीस झालं. दिनेश कार्तिक दबावाखाली चेंडू नीट पकडू शकला नाही. घाईगबडीत त्याची नजर चेंडूवर नव्हती. त्यामुळे तो नीट चेंडू पकडू शकला नाही. त्याच नुकसान आरसीबीला सहन कराव लागलं.

दिनेश कार्तिकपेक्षा पराभवाला आणखी कोण जबाबदार?

दिनेश कार्तिकपेक्षा आरसीबीचे गोलंदाज त्यांच्या पराभवाला जास्त कारणीभूत आहेत. 4 ओव्हरमध्ये लखनौच्या टीमने 23 रन्सवर 3 विकेट गमावले होते. मात्र त्यानंतर मार्कस स्टोयनिस आणि निकोलस पूरनने आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. आरसीबीचा एकही गोलंदाज या जोडीला रोखू शकला नाही. स्टॉयनिसने 30 चेंडूत 65 रन्स कुटल्या. निकोलस पूरनने 19 चेंडूत 62 धावांची तुफानी खेळी केली. दोघांनी मिळून 12 सिक्स आणि 9 फोर मारले. धावा लुटवणारे आरसीबीचे दोन बॉलर

आरसीबीच्या गोलंदाजांबद्दल बोलायच झाल्यास, हर्षल पटेल आणि कर्ण शर्माने धावा देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 48 रन्स दिल्या. प्रतिओव्हर 12 रन्सचा इकॉनमी रेट होता. कर्ण शर्माने 3 ओव्हरमध्ये 48 रवन्स दिल्या. त्याचा इकॉनमी रेट प्रति ओव्हर 16 रन्स होता.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.