India vs New Zealand: सूर्या-रोहित जोडीची कमाल, भारताचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, मालिकेतही आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.

India vs New Zealand: सूर्या-रोहित जोडीची कमाल, भारताचा न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, मालिकेतही आघाडी
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 11:31 PM

जयपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांना सुरुवात झाली असून पहिला सामना जयपूरच्या मैदानात नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला आहे. सामना तसा एका क्षणी भारताच्या पारड्यात झुकल्याचं दिसून येत होतं. पण अखेरच्या काही ओव्हर्समध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत भारताच्या हातातून सामना खेचण्याचा प्रयत्न केला. एकावेळी भारताला अखेरच्या 3 चेंडूत 3 धावांची गरज होती. त्यावेळी पंतने चौकार खेचत भारताला सामना जिंकवला.

सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर न्यूझीलंडने 164 धावा केल्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार आणि रोहितने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. रोहितने 36 चेंडूक 48 धावा केल्या. तर सूर्यकुमारने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावा केल्या. पण सूर्या बाद होताच श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर दोघेही बाद झाले. ज्यानंतर पंतने अखेरच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना चौकार लगावत विजय भारताच्या नावे केला.

मालिकेतही भारताची आघाडी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना भारताने जिंकल्याने भारत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील दोन सामन्यानंतर भारत 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

इतर बातम्या

आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 धावांत संघ ऑलआऊट, 7 खेळाडू शून्यावर बाद, वाचा कुठे घडला ‘हा’ अजब सामना

IND vs NZ: रोहित शर्माच्या कर्णधार असताना विराट संघात काय करणार?, रोहितनेच दिलं उत्तर

(In India vs New zealand first T20 match India won against New zealand take 1-0 lead in Series)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.