आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 धावांत संघ ऑलआऊट, 7 खेळाडू शून्यावर बाद, वाचा कुठे घडला ‘हा’ अजब सामना

विरोधी संघाची अशी हालत करणाऱ्या संघाच्या कर्णधाराने सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली. 11 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 1 रन देत 3 विकेटही घेतले.

आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 धावांत संघ ऑलआऊट, 7 खेळाडू शून्यावर बाद, वाचा कुठे घडला 'हा' अजब सामना
नेपाळ महिला संघ

मुंबई: टी20 क्रिकेट हा क्रिकेट खेळाचाच एक असा प्रकार आहे, जिथे एका षटकात 20 ते 30 रन निघतात. पण याच प्रकारात दर कोणता संघ केवळ 27 धावा करुन बाद झाला तर..? हो असं घडलंय तेही एका आंतरराष्ट्रीय सामन्यात हा सामना म्हणजे नेपाळ आणि कतार या देशांच्या महिला संघामध्ये झालेल्या टी20 सामना. यावेळी हा सामना एकहाती नेपाळने  119 धावांच्या फरकाने जिंकला.

सध्या नेपाळ महिला संघ कतारच्या दौऱ्यावर आहे. यावेळी दोन्ही संघामध्ये आज (16 नोव्हेंबर) रोजी पहिली टी20 मॅच खेळवण्यात आली. यावेळी दोन्ही संघांनी विजयासाठी फार प्रयत्न केले, पण नेपाळच्या संघाने त्यांच्या अनुभवाचा फायदा उचलत एकहाती विजय कतारवर मिळवला. यावेशी नेपाळलने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या बदल्यात 146 धावा केल्या. संघाकडून इंदु बर्मा हिने सर्वाधिक 55 धावा केल्या तर सीता राणाने 33 चेंडूत 39 धावा केल्या.  ज्यानंतर 147 धावांचे आव्हान कतार संघासमोर होते.

7 खेळाडू शून्यावर बाद

147 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या कतार संघाची पहिलीच ओव्हर खराब गेली. ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर लागोपाठ दोन विकेट गेले. असे होत संघाच्या 14 धावा होईपर्यंच 6 गडी तंबूत परतले. ज्यातील 4 फलंदाज एकही धाव करु शकले नाहीत. यानंतर सातव्या विकेटसाठी 12 धावांची भागिदारी झाली खरी पण नंतर आणखी एक विकेट पडली. ज्यानंतर अवध्या 27 धावांत सर्व संघ सर्वबाद झाला. यावेळी एकूण 7 खेळाडू शून्यावर बाद झाले. ज्यामुळे नेपाळचा संघ 119 धावांनी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. यावेळी नेपाळची कर्णधार रुबीना छेत्रीने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. तिने 11 चेंडूत 1 धाव देत 3 विकेट्स घेतल्या.

इतर बातम्या

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या आव्हानासाठी भारतीय खेळाडू सज्ज, द्रविड-रोहित जोडीने घेतला संघाचा ताबा

ICC ची मोठी घोषणा! भारतात पार पडणार टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 50 ओव्हर्सचा विश्वचषक

विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

(Qatar women cricket team all out on 27 runs against nepal women team)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI