विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

T20 वर्ल्ड कप स्पर्धा संपली असून आता भारतीय क्रिकेट संघ आपल्या मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.

विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!
भारत विरुद्ध न्यूझीलंड
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 9:05 AM

मुंबई: नुकताच टी20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup) पार पडला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मात देत स्पर्धा जिंकली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रथमच टी20 विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे. दरम्यान भारतीय संघाचा विचार करता भारत सेमीफायनल सामन्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर गेला होता. पण आता भारतीय संघ पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये परतणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबद्दलची माहिती यापूर्वीच दिली आहे. या वेळापत्रकात विविध देशांसोबत भारत  4 टेस्ट, 3 वनडे आणि 14 T20 सामने खेळणार आहे. ज्यातील सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांनी होणार आहे.

नवे सामने-नवा संघ

न्यूझीलंडच्या दौऱ्याला 17 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. आधी 3 टी20 आणि नंतर 2 कसोटी सामने खेळवले जातील. दरम्यान भारतीय संघात मागील काही दिवसांत झालेल्या बदलांनुसार टी20 संघाचा कर्णधार म्हणून विराटच्या जागी रोहित काम पाहिल. संघाचं प्रशिक्षक पदही रवी शास्त्रींकडून राहुल द्रविडकडे देण्यात आलं आहे. टी20 आणि कसोटी सामन्यांसाठी नवे संघही जाहीर करण्यात आले आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.

असं आहे वेळापत्रक-

टी20 मालिका

पहिला सामना- बुधवारी 17 नोव्हेंबर, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, सायंकाळी सात वाजल्यापासून

दुसरा सामना- शुक्रवार, 19 नोव्हेंबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम रांची, सायंकाळी सात वाजल्यापासून

तिसरा सामना- रविवार-21 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता, सायंकाळी सात वाजल्यापासून

कसोटी मालिका

पहिला सामना, 25 ते 29 नोव्हेंबर,  ग्रीन पार्क कानपूर, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.

दुसरा सामना, 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम मुंबई, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल.

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

Video: विश्वचषक जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच अजब सेलिब्रेशन, बुटातून घेतला ड्रिंक्सचा आस्वाद, नेमकं कारण काय?

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

(Know India vs New Zealand Series full series schedule)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.