ICC ची मोठी घोषणा! भारतात पार पडणार टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 50 ओव्हर्सचा विश्वचषक

2023 चा वर्ल्ड कप भारतात पार पडल्यानंतर पुढील आठ वर्षात भारतात आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धा पार पडणार आहेत. ज्यामध्ये भारत बांग्लादेश आणि श्रीलंका यांनाही सोबत घेणार आहे.

ICC ची मोठी घोषणा! भारतात पार पडणार टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 50 ओव्हर्सचा विश्वचषक
आयसीसीने नुकतीच ही मोठी घोषणा केली आहे.
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 5:53 PM

मुंबई: आयसीसीने पुढील 10 वर्षांसाठी कोणत्या देशांत कोणती स्पर्धा होणार याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. यानुसार 2024 ते 2031 या काळात टी20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वन-डे क्रिकेटचा वर्ल्ड कप अशा साऱ्या स्पर्धा कुठे होणार हे स्पष्ट झालं आहे. यजमान देशांची नाव समोर आली आहे. त्यानुसार भारतात यातील तीनही महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. यात 2026 मध्ये टी20 वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्यात मिळून होईल. तर 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन भारतात होईल. तर 2031 मध्ये भारत आणि बांग्लादेश मिळून वन-डे वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहेत.

आयसीसीने 2024 ते 2031 पर्यंतच्या प्रत्येक वर्षीच्या एका मोठ्या स्पर्धेचं ठिकाण जाहीर केलं आहे. यावेळी अमेरिकेत पहिल्यांदा एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन होईल. 2024 चा टी20 वर्ल्ड कप अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीज हे देश मिळून याचे आयोजन करतील.

आयसीसीच्या कार्यक्रमांची यादी

2024 टी20 वर्ल्ड कप- वेस्ट इंडीज आणि अमेरिका 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी- पाकिस्तान 2026 टी20 वर्ल्ड कप- भारत आणि श्रीलंका 2027 वर्ल्ड कप- दक्षिण आफ्रीका, जिम्बाब्वे आणि नामीबिया 2028 टी20 वर्ल्ड कप- ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलैंड 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी- भारत 2030 टी20 वर्ल्ड कप- इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड 2031 वर्ल्ड कप- भारत आणि बांग्लादेश

इतर बातम्या

विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता

हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त

(ICC events host nations as india will host 2026 t20 world cup 2029 champions trophy and 2031 world cup)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.