टीम इंडियाविरुद्ध टी20 सामन्यांसाठी न्यूझीलंड संघ अडचणीत, नवनिर्वाचित कर्णधार भारताविरुद्ध ‘फेल’

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीचा नुकताच संघ जाहीर केला. या संघात कर्णधार केन विल्यमसनच्या जागी नेतृत्तव दुसराच खेळाडू करणार आहे.

टीम इंडियाविरुद्ध टी20 सामन्यांसाठी न्यूझीलंड संघ अडचणीत, नवनिर्वाचित कर्णधार भारताविरुद्ध 'फेल'
न्यूझीलंड संघ
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 5:22 PM

मुंबई : नुकताच टी20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup) पार पडला. त्यानंतर आता जागतिक क्रिकेटमधील ताकदवर संघ असणारे भारत आणि न्यूझीलंड एकमेंकाशी भिडणार आहेत. न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर आला असून 17 नोव्हेंबरपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. यापूर्वी नुकताच न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीचा संघ जाहीर केला आहे. या संघाशी संबंधित मोठी बातमी म्हणजे या संघात कर्णधार केन विल्यमसनचा समावेश केलेला नाही. केन टी-20 मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी टीम साऊदीकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. पण हीच गोष्ट न्यूझीलंडसाठी मोठी अडचण ठरु शकते.

याचं कारण साउदीने याआधी न्यूझीलंडचं नेतृत्त्व केलं असलं तरी भारताविरुद्धचा त्याचा रेकॉर्ड खराब आहे. तसंतर साऊदीने 18 पैकी 12 टी20 सामन्यात कर्णधार म्हणून संघाला विजय मिळवून दिला आहे. पण न्यूझीलंडने साऊदीच्या नेतृत्त्वाखाली दोन वेळा भारताविरुद्ध टी20 सामने खेळले असून दोन्ही वेळा न्यूझीलंडचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता यावेळीतरी साऊदी टीम इंडियाविरुद्ध कमाल करणार का? याकडे किवीजचे लक्ष आहे.

मार्टिन गप्टिलकडे फलंदाजीचे नेतृत्व

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत फलंदाजीची जबाबदारी अनुभवी मार्टिन गप्टिलच्या खांद्यावर असेल. याशिवाय डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स हे फलंदाज देखील संघात असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूरमध्ये झाल्यानंतर दुसरा सामना रांचीमध्ये आणि तिसरा सामना कोलकातामध्ये होईल. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 21 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर संघ कानपूरहून कोलकात्याला रवाना होईल.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जिमी निशम, काईल जेमिसन, टॉड अॅस्टले, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ईश सोढी

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

इतर बातम्या

विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता

हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त

(Tim Southee got t20 captaincy his record is poor against team india)

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.