IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या आव्हानासाठी भारतीय खेळाडू सज्ज, द्रविड-रोहित जोडीने घेतला संघाचा ताबा

विश्वचषक स्पर्धेत खास कामगिरी न करु शकलेला भारतीय क्रिकेट संघ आता आपल्या मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करणार आहे. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.

1/5
नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचशकात भारत सेमीफायनल सामन्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर गेला होता. पण आता भारतीय संघ पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये परतणार आहे. भारत न्यूझीलंडविरुद्ध 3 टी20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी संघही जाहीर झाले असून बऱ्याच बदलांसह खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरले आहेत. बीसीसीआयने नुकतेच खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत.

2/5
यावेळी संघात सर्वात मोठा बदल म्हणजे टी20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड काम पाहणार आहे. त्यामुळे हे नवं त्रिकुट काय कमाल करतं हे पाहाणं औेस्तुक्याचं ठरणार आहे.

3/5
रोहित शर्माने याआधी भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं असलं तरी आता विराटने टी20 संघाचं कर्णधारपद सोडल्याने पूर्णपणे जबाबदारी रोहितवर आली आहे.

4/5
संघात बऱ्याच नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यावेळी काही खेळाडूंवर खास लक्ष असेल. यातील एक म्हणजे ऋतुराज गायकवाड. आयपीएल गाजवल्यानंतर आता ऋतु न्यूझीलंडविरुद्ध काय कमाल करतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

5/5
ऋतुसोबत सर्वांच लक्ष यंदाच्या आयपीएलमधील स्टार युवा खेळाडू वेंकटेश अय्यरवरही असणार आहे. त्याने यंदा उत्तम अष्टपैलू खेळी केली असून त्याला हार्दीकची रिप्लेसमेंट म्हटलं जात आहे. त्यामुळे त्याला यावेळी सामन्यांत संधी मिळते का? आणि मिळाल्यास तो काय कमाल करतो? हे पाहावे लागेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI