IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाने दिला झटका, टीम इंडिया All Out, कुहनेमनच्या फिरकीसमोर शरणागती
IND vs AUS 3rd Test : फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर टीम इंडियाचे टॉप प्लेयर टिकाव धरु शकले नाहीत. त्यांच्यात पॅव्हेलियनमध्ये परतण्याची जणून स्पर्धाच लागली होती. अवघ्या 33.2 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा डाव आटोपला.

IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मोठा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियाला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यासाठी टीम इंडियाने फिरकीला पोषक खेळपट्टी बनवली. पण त्यात पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच अडकली. मॅथ्यू कुहनेमन आणि नाथन लियॉन यांच्या फिरकीच्या जाळ्यात टीम इंडियाचा गेम झाला. पहिल्या तासाभरातच टीम इंडिया संकटात सापडली होती. लंचनंतर थोड्याच वेळात टीम इंडियाचा पहिला डाव 109 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या स्पिन बॉलर्सनी फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला.
कुहनेमनच्या फिरकीच उत्तर नाही
अवघ्या एका कसोटी सामन्याचा अनुभव असलेल्या मॅथ्यू कुहनेमन टीम इंडियाची वाट लावली. त्याने करिअरमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याडावात 5 विकेट घेतल्या. भारताची टॉप ऑर्डर कोसळली. टॉप फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. मॅथ्यू कुहनेमन आणि नाथन लियॉन यांच्या फिरकी गोलंदाजीच टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरकडे कुठलही उत्तर नव्हतं. धाव फलकावर 50 धावा लागण्यापूर्वीच निम्मी टीम तंबूत परतली होती.
ऑस्ट्रेलियन स्पिनर्ससमोर हतबल
मॅथ्यू कुहनेमन टीम इंडियाचा निम्मा संघ गारद केला. त्याने 5 विकेट काढल्या. नाथन लियॉनने 3 आणि टॉड मर्फीने एक विकेट काढली. रोहितने 23 चेंडूत (12), शुभमन गिलने 18 चेंडूत (21), चेतेश्वर पुजारा (1), रवींद्र जाडेजा 9 चेंडूत (4) आणि श्रेयस अय्यर शुन्यावर बाद झाला. 45 धावात निम्मी टीम तंबूत परतली होती. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक (22) धावा केल्या. त्याला टॉड मर्फीने LBW आऊट केलं. टीम इंडियाचे 5 फलंदाज पहिल्या इनिंगमध्ये 10 रन्सच्या आत आऊट झाले. कुहनेमनच्या फिरकीचा कहर
रोहित नंतर केएल राहुलच्या जागी संधी मिळालेला शुभमन गिल बाद झाला. त्याने 3 चौकार मारले. शुभमनला कुहनेमनने कॅप्टन स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केलं. चेतेश्वर पुजारा आल्यापावली तंबूत परतला. नाथन लियॉनने त्याला बोल्ड केलं. मागच्या दोन कसोटीत दमदार कामगिरी करणारा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा आज लवकर बाद झाला. लियॉनने त्याला कुहनेमन करवी झेलबाद केलं. श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. कुहनेमनला त्याला क्लीन बोल्ड केलं
