IPL 2021: धोनीचे धुरंदर मुंबईवर भारी, ऋतुराजच्या आक्रमक खेळीसह 20 धावांनी विजय

दुसऱ्या पर्वातील सलामीच्या सामन्या चेन्नई सुपरकिंगने मुंबई इंडियन्सला धुळ चारत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. चेन्नईने मुंबईवर 20 धावांनी विजय मिळवला आहे.

IPL 2021: धोनीचे धुरंदर मुंबईवर भारी, ऋतुराजच्या आक्रमक खेळीसह 20 धावांनी विजय
CSK Won
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 12:19 AM

दुबई: कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व आजपासून पुन्हा सुरु झाले. पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघादरम्यान खेळविण्यात आली. तशी अगदी अटीतटीची झाली नसली तरी मॅच अगदी एका रोलर कोस्टर राईडप्रमाणे होती. सुरुवातीला संपूर्णपणे मुंबईच्या पारड्यात असणारी मॅच नंतर मात्र चेन्नईने खेचून नेत 20 धावांनी विजय मिळवला. या सामन्या चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) धडाकेबाज अशी नाबाद 88 धावांची खेळी खेळत चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या चेन्नईचे दिग्गज फलंदाज एका मागोमाग एक बाद होत गेले. फाफ आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यानंतर रायडूही एकही धाव न करता दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर रैना 4 आणि धोनी 3 धावा करुन बाद झाला. पण सलामीवीर ऋतुराजने नाबाद 88 धावा ठोकल्या. त्याला जाडेजाने 26 आणि ब्राव्होने 23 धावांची मदत करत मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले.

मुंबईचे फलंदाज ‘FAIL’

मुंबईला 157 धावांचे आव्हान होते. जे त्यांच्यासारख्या दिग्गज संघासाठी तितके अधिक नव्हते. पण कर्णधार रोहित आणि अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या अनुपस्थितीत सर्वच फलंदाज गारद पडले. मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.

मराठमोळा ऋतुराज सामनावीर

चेन्नईच्या विजयात मोठा वाटा उचलणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सामनावीर म्हणून गौैरवण्यात आलं. एकीकडे मुंबईच्या माऱ्यापुढे डुप्लेसी, मोईन अली सारखे दिग्ग शून्यावर बाद होत होते. त्यानंतर धोनी रैनाही 3, 4 धावा करुन तंबूत परतले असताना एकहाती खिंड लढवत ऋतुराजने 9 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 88 धावा ठोकल्या. ज्यामुळे मुंबईला चेन्नई 157 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य देऊ शकली. त्याच्या या कामगिरीसाठीच त्याला सामनावीरीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

हे ही वाचा

IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार

IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण

PHOTO: IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज, एका दिग्गज कर्णधाराचाही समावेश

(In IPL 2021 second seasons First match between MI vs CSK Dhonis Csk won by 20 runs Ruturaj gaikwad played crucial role)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.