IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण

आय़पीएलच्या उर्वरीत हंगामाला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. युएईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना सुरु असून या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित मात्र मैदानात दिसत नाही.

IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण
रोहित शर्मा

दुबई: कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) आजपासून पुन्हा सुरु झाली आहे. पहिलीच मॅच आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन दिग्गज  संघादरम्यान खेळविण्यात येत आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा नसल्यामुळे अनेकांना तो संघात का नाही? असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर कायरन पोलार्डने दिलं आहे.

आजचा सामना सुरु होण्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात सराव करताना दिसला होता. पण अचानक उपकर्णधार कायरन पोलार्ड नाणेफेकीसाठी मैदानात येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी नाणेफेकीनंतर पोलार्डला याबाबत विचारणा केली असता त्याने याचे कारण सांगितले. ”रोहितची प्रकृती काहीशी ठिक नसल्याने त्याला विश्रांती दिली आहे. त्यामुळे त्याच्या जागी मी संघाचं नेतृत्त्व करणार आहे. तो लवकरच ठिक होऊन संघात पुनरागमन करेल. अशी आशा आहे”

मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य

नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या चेन्नईचे दिग्गज फलंदाज एका मागोमाग एक बाद होत गेले. फाफ आणि मोईन अली शून्यावर बाद झाल्यानंतर रायडूही एकही धाव न करता दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर रैना 4 आणि धोनी 3 धावा करुन बाद झाला. पण सलामीवीर ऋतुराजने नाबाद 88 धावा ठोकल्या. त्याला जाडेजाने 26 आणि ब्राव्होने 23 धावांची मदत करत मुंबईसमोर 157 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

हे ही वाचा –

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघात बदल, रणजीमध्ये हॅट्रीक घेणारा धुरंदर अष्टपैलू दाखल

T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

(In mumbai indians vs Chennai Superkings match Rohit Sharma is not in team click to know why)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI