AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujurat Titans : Hardik pandya ने वाचवलं 38 वर्षाच्या प्लेयरच करियर, IPL 2023 च्या पहिल्या मॅचमध्ये दिली संधी

IPL 2023 CSK vs GT : गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याने सीजनच्या पहिल्याच मॅचमध्ये मोठा निर्णय घेतला. त्याने 38 वर्षाच्या खेळाडूवर महत्वाची जबाबदारी दिली.

Gujurat Titans : Hardik pandya ने वाचवलं 38 वर्षाच्या प्लेयरच करियर, IPL 2023 च्या पहिल्या मॅचमध्ये दिली संधी
hardik pandya
| Updated on: Apr 01, 2023 | 11:40 AM
Share

IPL 2023 Gujurat Titans vs Chennai Super Kings : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीमने सीजनच्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सला 5 विकेटने हरवलं. हार्दिक पंड्याने या मॅचच्या सुरुवातीला एका मोठा हैराण करणारा निर्णय घेतला. त्याने 38 वर्षाच्या एका प्लेयरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. हा खेळाडू बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे.

थेट ओपनिंगला पाठवलं

हार्दिक पंड्याने सीजनच्या पहिल्याच सामन्यात महत्वाचा निर्णय घेतला. त्याने विकेटकीपर फलंदाज ऋद्विमान साहाला टीममध्ये संधी दिली. ऋद्धिमान साहा बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याच्या पुनरागमनाची शक्यता नाहीय. या आयपीएल सीजनमध्ये साहा बेंचवर दिसेल, असं सर्वाना वाटत होतं. पण पांड्याने ऋद्धिमान साहावर विश्वास दाखवला व त्याला ओपनिंगची जबाबदारी दिली.

कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला

ऋद्धिमान साहाने मिळालेल्या संधीचा फायदा उचलला. त्याने यष्टीपाठी कमालीच प्रदर्शन केलं. ओपनर म्हणून खेळताना त्याने 16 चेंडूत 25 धावा फटकावल्या. या छोट्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 2 षटकार निघाले. ऋद्धिमान साहाला या प्रदर्शनामुळे पुढच्या सामन्यात सुद्धा संधी मिळू शकते. मागच्या सीजनमध्ये सुद्धा दमदार बॅटिंग

ऋद्धिमान साहा भारतीय टीमसाठी 40 टेस्ट आणि 9 वनडे सामने खेळलाय. त्याने आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी डेब्यु केला. गुजरातने मागच्या सीजनमध्ये ट्रॉफी जिंकली. त्याने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली शुभमन गिलसोबत सलामीवीराची महत्वाची भूमिका पार पडली होती. साहाने मागच्या सीजनमध्ये 11 सामन्यात 3 अर्धशतकांसह 317 धावा फटकावल्या.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.