IPL 2023 : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला आता कोणी देत नाही भाव, IPL मध्ये करिअर वाचवण्यासाठी खेळणार

Team India: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने बऱ्याच काळापासून भारतीय टीमचा भाग नसलेल्या खेळाडूचा समावेश केला आहे. मागच्या सीजनमध्ये सुद्धा हा खेळाडू फ्लॉप ठरला होता.

IPL 2023 : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूला आता कोणी देत नाही भाव, IPL मध्ये करिअर वाचवण्यासाठी खेळणार
Delhi capitalsImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:00 AM

Indian Premier League 2023 : दिल्ली कॅपिटल्सने IPL 2022 मध्ये एका अशा खेळाडूचा टीममध्ये समावेश केलाय, ज्याच करिअर संपल्यात जमा आहे, असं मानलं जात होतं. यंदाच्या सीजनमध्ये डेविड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच नेतृत्व करतोय. मागच्यावर्षाच्या अखेरीस ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये तो खेळू शकणार नाहीय. सध्या तो रिकव्हरी प्रोसेसमध्ये आहे. दिल्लीने अशा प्लेयरला संधी दिलीय, जो बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नाहीय.

आयपीएल करिअरच्या सुरुवातीला या खेळाडूची बरीच चर्चा झाली होती. त्याला नाव, प्रसिद्धी मिळाली होती. पण या खेळाडूला टीम इंडियात आपली छाप उमटवता आली नाही. आयपीएलचा हा सीजन या खेळाडूसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने वाचवलं करिअर

दिल्ली कॅपिटल्सने मिनी ऑक्शनमध्ये 5 खेळाडूंवर बोली लावली होती. या यादीत टीम इंडियाचा फलंदाज मनीष पांडे होता. मनीष पांडेला आयपीएल 2022 च्या ऑक्शनमध्ये लखनौ सुपरजायंट्सने 4.6 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

आता किती कोटींना विकत घेतलं?

मनीषचा फॉर्म चांगला नसल्याने LSG ने त्याला फार संधी दिली नाही. खराब फॉर्ममुळे त्याला टीमच्या बाहेर केलं. यावेळी तो अनसोल्ड राहिलं असं अनेकांना वाटत होतं. पण दिल्ली कॅपिटल्सने 2.4 कोटी रुपये खर्च करुन मनीष पांडेला विकत घेतलं. त्यामुळे मनीष पांडेसाठी हा सीजन महत्वाचा असणार आहे.

IPL 2022 मध्ये किती धावा केल्या?

मनीष पांडेने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमपासून केली. तो आयपीएलमध्ये अजूनपर्यंत 160 मॅच खेळलाय. मनीष पांडेने 29.90 च्या सरासरीने 3648 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 1 सेंच्युरी आणि 21 अर्धशतकं झळकवली आहेत. आयपीएल 2022 मध्ये मनीष पांडेने 6 मॅचमध्ये फक्त 88 धावा केल्या. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 बाहेर बसवण्यात आलं.

टीम इंडियाकडून खेळताना कामगिरी कशी आहे?

मनीष पांडेसाठी टीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. मनीष पांडे जुलै 2021 मध्ये अखेरचा सामना टीम इंडियाकडून खेळला. तेव्हापासून तो टीमचा भाग नाहीय. मनीष पांडे टीम इंडियासाठी आतापर्यंत 39 टी 20 सामने खेळलाय. यात त्याने 44.31 च्या सरासरीने आणि 126.15 च्या स्ट्राइक रेटने 709 धावा केल्या आहेत. भारतासाठी 29 वनडे सामने खेळला असून त्यात त्याने 566 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स टीम

डेविड वॉर्नर (कॅप्टन), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोव्हमॅन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नोर्त्जे, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल, फिलिप साल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रॉसो.

Non Stop LIVE Update
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.