IPL 2022, RCB : तब्बल 7 वर्षांनी बंगळुरू पुन्हा क्वालिफायर 2 खेळणार, जाणून घ्या RCBचा इतिहास

क्वालिफायर दोनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत तिसऱ्यांदा होत आहे.

IPL 2022, RCB : तब्बल 7 वर्षांनी बंगळुरू पुन्हा क्वालिफायर 2 खेळणार, जाणून घ्या RCBचा इतिहास
बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत तिसऱ्यांदा होत आहे.
Image Credit source: social
| Updated on: May 26, 2022 | 2:03 PM

मुंबई : आयपीएलमध्ये एलिमिनेटर (eliminator) सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) अहमदाबादचे तिकीट काढले आहे. कारण, अहमदाबादमध्ये बंगळुरूला आता क्वालिफायर 2 खेळायचा आहे. हा संघ क्वलिफायर 2 खेळण्यासाठी एकूण तिसरी आणि गेल्या 7 वर्षांत पहिलीच वेळ आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर 2 मध्ये आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. दोनही संघांमधील क्रिकेटच्या या लढतीतून कोणता संघ अंतिम फेरीत जाणार हे ठरेल. त्यानंतर त्यांचा सामना 29 मे रोजी गुजरात टायटन्सशी होईल. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूला नशिबाने प्लेऑफ खेळण्यासाठी तिकीट मिळाले असले पण या संघाने क्वालिफायर 2 खेळण्यासाठी अहमदाबादचे तिकीट स्वत:च कापले आहे. क्वालिफायर 2मध्ये त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने आरसीबीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत अंतिम फेरीचे तिकीट जिंकण्याचे आव्हान आरसीबीसाठी सोपे असू शकत नाही.

IPLमधील बंगळुरूचा इतिहास

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यावेळी तिसरा क्वालिफायर 2 खेळणार आहे. याआधी तो शेवटचा क्वालिफायर 2 मध्ये 2015मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला सीएसकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याचवेळी या संघाला 2011 मध्ये प्रथमच क्वालिफायर दोन खेळण्याची संधी मिळाली. त्या मोसमात खेळल्या गेलेल्या क्वालिफायर दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. त्यानंतर आरसीबीने मुंबई इंडियन्स पराभव करत फायनलचे तिकीट काढले आहे.

आरसीबीचं ट्विट

आरसीबीच्या खेळाडुंची उत्तम कामगिरी

क्वालिफायर दोनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत तिसऱ्यांदा होत आहे. मुंबई आणि चेन्नईप्रमाणे हा संघही आयपीएलमध्ये चॅम्पियन राहिलाय. आयपीएल 2022मध्ये राजस्थान रॉयल्सची ताकद आहे की तो एक संघ म्हणून खेळत आहे. दुसरीकडे एलिमिनेटर जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नक्कीच प्रोत्साहन मिळाले असेल. पण त्यांच्या विजयात सांघिक प्रयत्नापेक्षा एक दोन खेळाडूंची कामगिरी चांगली असणार आहे.