KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत

आयपीएलच्या 14 व्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) हा भव्य सामना पार पडणार आहे.

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत
डेल स्टेन

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाच्या अंतिम सामन्याला केवळ एक दिवस शिल्लक आहे. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) केकेआर आणि सीएसके (KKR vs CSK) यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे एका वेळी गुणतालिकेत अगदी खालच्या स्थानांमध्ये असणाऱ्या केकेआरने अंतिम सामन्यांपर्यंच मारलेली धडक आणि धोनीच्या चेन्नईने काय ठेवलेला क्लास. दोघांच्यतील या सामन्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) त्याचं मत समोर आणलं आहे. त्याच्या मते चेन्नईचा संघ त्यांच्या चांगल्या फॉर्ममुळे सामन्यात सरस ठरेल. तर केकेआर संघाला एका गोष्टीचा तोटा होऊ शकतो.

स्टेनच्या मते केकेआर संघाला त्यांचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिक यांचा खराब फॉर्म याचा सर्वाधिक धोका असून यामुळे त्यांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागू शकतो. स्टेनने  ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “उद्याचा सामना अगदी चुरशीचा होणार हे नक्की! इथवर पोहोचलेले्या केकेआरला त्यांच्या कर्णधाराचे काही चूकीचे निर्णय आणि खराब फॉर्म याचा फटका अंतिम सामन्यात पोहचू शकतो. तसचं चेन्नईचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या क्वॉलीफायर सामन्यात त्यांनी ज्याप्रकारे दिल्लीला पराभूत केलं त्यानुसार ते सामना जिंकण्याची अधिक शक्यता आहे.”

चेन्नईला त्रिकुटाचा धोका

उद्याच्या सामन्यात चेन्नईचं पारडं जड असलं तरी केकेआरचे तीन खेळाडू चेन्नसाठी फार धोकादायक आहेत. हे त्रिकुट म्हणजे सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब अल् हसन. या तिघा फिरकीपटूंनी आतापर्यंत आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा गोलंदाद वरुण यानेतर सर्वात बेस्ट फिरकी गोलंदाजी यंदाच्या पर्वात केली आहे. त्याच जोरावर त्याची आगामी टी20 विश्व चषकासाठीही निवड झाली आहे. तिघांच्या इकॉनोमीचा विचार करता वरुणची इकॉनोमी सर्वात कमी म्हणजे 6.40, त्यानंतर सुनीलची 6.44 आणि अखेर शाकिबची इकॉनोमी 6.64 इतकी आहे. दरम्यान टी20 प्रकारात 7 पेक्षा कमी इकॉनोमी म्हणजे उत्कृष्ट असल्याने सीएसकेची डोकेदुखी वाढली आहे.

हे ही वाचा

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ

T20 World Cup मधल्या सिक्सर किंग्सची यादी, टॉप 5 मध्ये भारताचा एकमेव खेळाडू

(In KKR vs CSK IPL Final KKR May Loose due to morgans bad captaincy says dale steyn)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI