AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: संघाची अवस्था बिकट असतानाही जेमिसन मात्र स्मितहास्य करण्यात व्यस्त, आरसीबीच्या तंबूतील ‘ती’ तरुणी कोण?

सोमवारी झालेल्या केकेआर विरुद्द आरसीबी सामन्यात केकेआरने 9 विकेट्सने मात देत आरसीबीला नमवला. पण या सामन्यानंतर आरसीबीच्या कायल जेमिसन याचा एक फोटो बराच व्हायरल झाला आहे.

IPL 2021: संघाची अवस्था बिकट असतानाही जेमिसन मात्र स्मितहास्य करण्यात व्यस्त, आरसीबीच्या तंबूतील 'ती' तरुणी कोण?
कायल जेमिसन
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 7:26 PM
Share

मुंबई: युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या उर्वरीत पर्वात (IPL 2021) विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरुला दुसऱ्या पर्वातील सलामीच्या सामन्यात इयॉन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR vs RCB) धुळ चारली. 9 विकेट्सने दमदार विजय मिळवत केकेआर विजयी पताका रोवली. या लाजिरवाण्या पराभवानंतर पुन्हा एकदा विराटला (Virat Kohli) टीकांचा धनी व्हावं लागलं. पण यंदा विराटपेक्षा अधिक चर्चा आरसीबीचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन (kyle jamieson) याची होती. बाद झाल्यानंतर तंबूत बसलेला जेमिसनचा एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये तो आरसीबीच्या ताफ्यातील एका महिलेकडे बघत हसताना दिसत आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असून ही महिला कोण? याचीही चर्चा आहे.

अबूधाबीच्या शेख जायद मैदानात सुरुवातीला उत्तम गोलंदाजी करत केकेआरने आरसीबीला 92 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर फलंदाजीला येत केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि सलामीचा सामना खेळत असलेल्या वेकंटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने धमाकेदार फलंदाजी करत 9 विकेट्सने दमदार विजय मिळवला. दरम्यान हे सर्व घडत असताना आरसीबीचे फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना आरसीबीचा गोलंदाज कायल जेमिसन मात्र वेगळ्याच दुनियेत होता. तो आरसीबीची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतम (Navnita Gautam) हिच्याकडे पाहत स्मितहास्य देत होता. त्यामुळे संघ अडचणीत सापडला असताना जेमिसनचे लक्ष्य भलतीकडेच असल्याने त्याचा हा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांनी लुटली मजा..

जेमिसनच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या असून अनेकांनी हा फोटो शेअर करत भन्नाट प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. अनेकांनी याला पुरुष काय पुरुषच राहतील असी कमेंट केली आहे. तर काहींनी संघ कितीही अडचणीत असून जेमिसन आपल्याच दुनियेत अशाही कमेंट केल्या आहेत.

कोण आहे नवनीता गौतम?

आरसीबीच्या डग आऊटमध्ये बसलेली फोटोतील मुलगी टीमची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतम आहे. 2019 साली नवनीता गौतम आरसीबीच्या टीमसोबत जोडली गेली आहे. मसाज थेरपिस्टच्या पेशात नवनीताला बराच अनुभव आहे. आरसीबीच्या टीममध्ये यायच्याआधी ती ग्लोबल टी-20 कॅनडामध्ये टोरांटो नॅशनल टीमसोबतही होती. याशिवाय ती भारताच्या महिला बास्केटबॉल टीमसोबत आशिया कपमध्येही होती

हे ही वाचा

IPL 2021: धोनी-रोहितला मागे टाकत कोहलीच्या नावे नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

पाकिस्तानची नाचक्की सुरुच! न्यूझीलंडनंतर इंग्लंडकडूनही दौरा रद्द

एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरचा थरार, 6 चेंडूत 7 धावांचं सोपं टार्गेट, तरी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस कायम

(In KKR vs RCB match kyle jamieson photo of blushing towards rcb girl went viral whos that girl)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.