RCB vs CSK: ‘सुपरमॅन’ कोहली, हवेत उडी घेत विराटने घेतलेली ही कॅच पाहाच!

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद करण्यासाठी विराटने घेतलेली झेप सध्या संपूर्ण इंटरनेट व्यापत आहे. त्याने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

RCB vs CSK: 'सुपरमॅन' कोहली, हवेत उडी घेत विराटने घेतलेली ही कॅच पाहाच!
विराट कोहली

IPL 2021: भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) यांच्यात सुरु असलेल्या चेन्नई सुपरकिंग्स (CSK) विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) सामन्यात विराटने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन दाखवलं आहे. फलंदाजी करताना अप्रतिम खेळी करत अर्धशतक झळकावणाऱ्या एक अप्रतिम असा झेलंही घेतला. त्याने सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) 38 धावांवर बाद केलं.

विराटच्या संघाने चेन्नईला 157 धावांच आव्हान दिलं आहे. जे चेन्नईचा संघ पाहता त्यांच्यासाठी मोठं नाही. त्यात सुरुवातीलाच सलामीवीर गायकवाड आणि डुप्लेसी यांनी अप्रतिम फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पण याचवेळी अनुभवी चहलच्या चेंडूवर विराटने गायकवाडची अप्रतिम कॅच घेतली. या कॅचवर विश्वास करणं थोडं अवघड असल्याने थर्ड अंपायरने देखील हा झेल चेक केला आणि अखेर आऊट करार देण्यात आलं. तर या कॅचचा व्हिडीओ तुम्हीही पाहाच

विराटसह देवदत्तचं अर्धशतक, पण मोठा स्कोर नाहीच

चेन्नईने गोलंदाजी घेतल्याने आरसीबीने प्रथम फलंदाजी केली होती. ज्यामध्ये सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी सुरुवातीपासूनच फटेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी आधी देवदत्तने आणि नंतर विराटने अर्धशतकाची नोंद केली. देवदत्तने 50 चेंडूत 70 धावा केल्या ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराटने देखील दमदार अर्धशतक लगावलं. त्याने 41 चेंडूत 53 धावा केल्या. या खेळीत विराटने 6 चौकार आणि एक षटकार ठोकला. पण त्या दोघानंतर एकाही खेळाडूला खास फलंदाजी करता आली नाही. डिव्हीलीयर्सने 12 आणि मॅक्सवेलने 11 धावा केल्या तर बाकी खेळाडूंना दुहेरी संख्याही गाठता न आल्याने आऱसीबी केवळ 157 धावाचं करु शकले.

चेन्नईचे गोलंदाज हुशार!

सुरुवातीला विराट आणि देवदत्तने धडाकेबाज फलंदाजी सुरु केली होती. त्यांनी 10 षटकातंच 90 च्या जवळ स्कोर नेऊन ठेवला. पण त्यानंतर मात्र चेन्नईच्या गोलंदाजानी टाईट गोलंदाजी करत आरसीबीला मोठा स्कोर कऱण्यापासून रोखलं यामध्ये शार्दूलने एका षटकात देवदत्त आणि एबी यांचे महत्त्वाचे विकेट घेतले. तर ब्राव्होने सर्वात भारी गोलंदाजी करत
चार षटकांत 24 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.

हे ही वाचा

AUSW vs INDW, 2nd ODI: नो बॉलवर कॅच झेलून जल्लोष, भारतीय महिलांचा मोठा पराभव, मालिकाही गमावली

IPL 2021 सुरु असतानाच सनरायजर्स हैद्राबाद संघात नवा खेळाडू दाखल, टी. नटराजनला कोरोनाची बाधा झाल्यामुळे बदल

Hardik Pandya : मुंबईच्या दोन्ही सामन्यात संधी नाही, हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातूनही बाहेर पडणार?

(In RCB vs CSK match captain Virat Kohli took awsome catch of ruturaj gaikwad)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI