PAK vs NZ: पाकच्या गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी सुरुच, न्यूझीलंडला 134 धावांवर रोखलं

भारताला 10 विकेटननी मात दिल्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धही अप्रतिम गोलंजाजीचे दर्शन घडवले आहे. त्यांनी न्यूझीलंड संघाला 134 धावात रोखलं आहे.

PAK vs NZ: पाकच्या गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी सुरुच, न्यूझीलंडला 134 धावांवर रोखलं
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील क्षण
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 10:47 PM

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यांना सुरुवात झाली असून ग्रुप स्टेजेस सामने संपून सुपर 12 चे सामने सुरु आहेत. यामध्ये भारताचा पहिल्या सामन्यात पाककडून 10 विकेट्सने पराभव झाला. पण तेव्हापासून पाक संघाने आपला फॉर्म तिळमात्र कमी होऊ दिलेला नाही. आताही न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाकने अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझूीलंडला 134 धावांवर रोखलं आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत पाकने भारताविरुद्ध घेतला तसाच गोलंदाजीचा निर्णय घेतल. सामन्यात सुरुवातीला न्यूझीलंडने थोडी चागंली सुरुवात केली. 36 धावांवर गप्टील 17 धावा करुन बाद झाला. त्यानंतर डॅरिन मिचेल आणि कर्णधार विल्यममनने एक चांगली भागिदारी केली. दोघांनी अनुक्रमे 27 आणि 25 धावा केल्या. त्यांच्यानंतर डेवन कॉन्वेने ही 27 धावा करत संघाला एक चांगलं टार्गेट मिळवून दिलं. यावेळीही भारताविरुद्ध पाक सामन्याप्रमाणे पाकच्.ा गोलंदाजानी अप्रतिम गोलंजाजी केली. रॉफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शाहीन, इमाद आणि हाफिज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

पाकिस्तानसमोर 135 धावांच आव्हान

आता फलंदाजीला आलेल्या पाकला 135 धावा करुन  सामना जिंकायचा आहे. न्यूझीलंडकडेही काही अप्रतिम गोलंदाज असून आज ते त्यांचा वापर कसा करणार  ते पाहाव लागेल ? पाकचा कर्णघार बाबर आणि यष्टीरक्षक रिजवान सुरुवातीला फलंदाजी पार पाडणार आहेत.

इतर बातम्या

T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!

मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

(In t20 world Cup match between Pakistan and new zealand Pakistan stops kiwis on 134 Runs they need 135 to win)