W, W…W..! निर्धाव षटकासह भारताला तिहेरी धक्का, साकीब महमूदचा टीम इंडियाला दणका
चौथ्या टी20 सामन्यात इंग्लंडने जबरदस्त खेळीचं दर्शन घडवलं. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर चौथ्या सामन्यात कमबॅकसाठी टीम इंडियाची धडपड सुरू होती. पण दुसऱ्या षटकातच टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला आहे. दुसऱ्या षटकातच भारताने तीन गडी गमवले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या टी20 सामना पुण्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. त्यामुळे भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघ मोठी कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. कारण दव फॅक्टर पाहता बोर्डवर जास्त धावा असणं आवश्यक आहे. असं असताना पहिल्या षटकात अभिषेक शर्माने चांगली सुरुवात करून दिली. एक चौकार आणि षटकार मारत 12 धावा काढल्या. पण दुसऱ्या षटकात मात्र सर्वच उलटं पडलं. संजू सॅमसन फॉर्मसाठी धडपड असताना या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट फेकून दिली. नेहमीप्रमाणे शॉट चेंडूवर विकेट टाकली. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट टेन्शन दिसत होतं. कारण टीम इंडियात आत बाहेर असतो. त्यामुळे असा फॉर्म पाहता त्याला पुन्हा संघात स्थान मिळणं कठीण होईल.
संजू सॅमसनने 3 चेंडूचा सामना केला आणि 1 धाव करून बाद झाला. पहिल्याच चेंडूवर साकिब महमूदने त्याला बाद केलं. शॉर्ट बॉल मारताना चूक केली आणि कार्सच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यामुळे नंतर आलेल्या तिलक वर्माकडून फार अपेक्षा होत्या. पण त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. दुसऱ्या चेंडूवर विकेट देऊन आला. त्यामुळे टीम इंडियावर दडपण वाढलं. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याची संधी असताना सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. पण त्यालाही काही खास करता आलं नाही. चार चेंडूंचा सामना केला आणि खातंही खोलता आलं नाही. साकीब महमूदने त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय
दुसऱ्या षटकात टीम इंडियाने निर्धाव षटक देत तीन विकेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अवघ्या 12 धावांवर तीन विकेट गमावल्या. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. त्यामुळे आता मधल्या फळीच्या फलंदाजांवर दडपण आलं आहे. दुसरीकडे अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा आहेत. दुसरीकडे, रिंकु सिंहचं संघात कमबॅक झालं आहे. आता तो कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. भारताला हा सामना जिंकायचा तर 180 च्या आसपास धावा करणं आवश्यक आहे.
