Video : क्रिकेट सामन्यातच दोन्ही संघात तुफान हाणामारी, क्रिकेटचे मैदान बदलले WWE च्या रिंगमध्ये, खेळाडूंचा बॅटने एकमेंकावर हल्ला

एका चांगल्या कामासाठी खेळवण्यात येत असलेला सामना कधी नियंत्रणा बाहेर गेला आली तुफान हाणामारी झाली हे आयोजकांना कळालेच नाही. या मारामरीत खेळाडूंनी अक्षरश: बॅटने एकमेंकावर हल्ला चढवला.

Video : क्रिकेट सामन्यातच दोन्ही संघात तुफान हाणामारी, क्रिकेटचे मैदान बदलले WWE च्या रिंगमध्ये, खेळाडूंचा बॅटने एकमेंकावर हल्ला
चालू क्रिकेट सामन्यातच हाणामारी सुरु झाली

केंट : क्रिकेट सामना म्हटलं की मैदानावर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात चुरशीचा सामना होतो. कधी फलंदाज जिंकतो तर कधी गोलंदाज बाजी मारतात. पण यावेळी प्रत्येक खेळाडू बॅटने बॉलची धुलाई करताना दिसतो. पण एका क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटू हे बॅटने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची धुलाई करताना दिसत आहेत. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या एका क्रिकेट मॅचमध्ये जे काही घडलं त्याने सर्वचजण हैराण झाले. इंग्लंडच्या केंट येथे एका लाईव्ह क्रिकेट सामन्यात दोन संघामध्ये तुफान हाणामारी झाली.

यूनायटेड किंगडमच्या केंट येथे एक चॅरिटी क्रिकेट मॅच अचानक WWE च्या रिंग मध्ये बदलला. जिथे खेळाडू चौकार-षटकार नाही तर एकमेंकाना लाथा-बुक्का हाणू लागले. त्यामुळे सामनाही रद्द करण्यात आला. केंट ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार हा सामना मोट पार्क क्रिकेट क्लबमध्ये होत होता. या सामन्यातून चॅरिटी मिळवून पाकिस्तान आणि केंटमध्ये मेडिकल ट्रीटमेंटसाठी मदत पोहचवणे हा उद्देश होता.

हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

ग्रेवसेंड आणि मेडवे यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात अचानक दोन्ही संघात बाचाबाची झाली आणि बघता बघता ही बाचाबाची हाणामारीमध्ये बदलली. खेळाडू एकमेंकाना लाथा-बुक्क्यांनी आणि बॅटने मारु लागले. त्याचवेळी सामना पाहायला आलेल्या काही महिलाही मध्ये पडून मारामारी सोडवू लागल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.

बाहेरुन आलेल्या गुंडानी केली हाणामारी-आयोजक

या घटनेनंतर स्पर्धेचे आयोजक शहजाद अक्रम यांनी निराशा व्यक्त केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चॅरिटीसाठी खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बाहेरुन आलेल्या काही गुंडांनी सर्व हाणामारी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडा तणाव होताच बाहेरुन घुसलेल्या काही गुंडानी मारामारी सुरु केली. ज्यामुळे सामनाही रद्द करावा लागल्याने अक्रम यांनी सांगितले. या हाणामारीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

हे ही वाचा :

दीपक चहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात

दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग

(In UK two Cricket teams fighting during Cricket match for charity video went viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI