T20 World Cup 2021: रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय, बांग्लादेश स्पर्धेतून बाहेर

टी20 विश्वचषकाच्या वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश या चुरशीत्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांग्लादेशला अवघ्या 3 धावांनी मात देत विजय खिशात घातला आहे.

T20 World Cup 2021: रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय, बांग्लादेश स्पर्धेतून बाहेर
वेस्ट इंडिज क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 8:33 PM

T20 Cricket World Cup 2021: यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) सुमार कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश (west indies vs bangladesh) या दोन्ही संघाच्या सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली आहे. अवघ्या 3 धावांनी रोमहर्षक विजय मिळवत वेस्ट इंडिजने विजय आपल्या नावे केला आहे. हा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. जो जिंकून वेस्ट इंडिजने स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवलं असून बांग्लादेशचं आव्हान जवळपास संपलं आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्या वेस्ट इंडिजकडे पहिली फलंदाजी आली असतान त्यांनी 142 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर 143 धावाचं आव्हान पूर्ण करताना बांग्लादेशचे बहुतेक फलंदाज अयशस्वी झाले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेल्या सामन्यात बांग्लादेश 139 धावाच करु शकल्याने 3 धावांनी पराभूत त्यांच्या पदरी पडला.

सामन्याचा लेखा-जोखा

दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्यानंतर बांग्लादेशच्या गोलंदाजानी चांगली कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला टिकू दिलं नाही. केवळ रोस्टन चेज (39) आणि निकोलस पूरन (40) यांनी टिकून फलंदाजी केल्यामुळे वेस्ट इंडिजने 142 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात खास झाली नाही. पण लिटॉन दासने 44 धावांची आक्रमक खेळी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेरच्या षटकात महम्मदउल्लाने नाबाद 31 धावा करत विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर बांग्लाेदेशला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

ग्रुप 1 ची स्थिती काय?

सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला नमवत दोन विजय नावे करत दुसरं स्थान गाठलं आहे. इंग्लंडपेक्षा त्यांचा नेटरनरेट कमी असल्यामुळे ते मागे आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघाने प्रत्येकी 1-1 सामना जिंकत अनुक्रमे तिसरं आणि चौथं स्थान मिळवलं आहे. तर आतापर्यंत एकही सामना न जिंकलेल्या बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज या संघातील वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. तर बांग्लादेशचं आव्हान जवळपास संपलं आहे.

Photos | ‘लिटील मास्टर’च्या टेस्ट डेब्यूची हाफ सेंच्युरी; कसा होता सुनील गावस्करांचा झंझावात?

T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय

दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर

(In West indies vs bangladesh match west indies won match with 3 runs bangladesh out of World cup know group 1 point table)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.