Photos | ‘लिटील मास्टर’च्या टेस्ट डेब्यूची हाफ सेंच्युरी; कसा होता सुनील गावस्करांचा झंझावात?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांचा आज गौरव होणार आहे.

1/5
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांचा आज गौरव होणार आहे. त्यामुळे पवार ठाकरेंसोबत गावस्कर वेंगसरकरांची आठवणींची ‘पार्टनरशीप’ पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

2/5
सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसंच माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये तयार करम्यात आलेल्या स्टँडचे आज उदघाटन देखील होणार आहे. मुंबईत हा सोहळा होतो आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर, याचबरोबर भारतीय संघाचे माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.

3/5
सुनील गावस्कर यांचे कसोटी पदार्पण 1971 साली झाले होते. वेस्टइंडिज दौऱ्यात त्यांनी क्रिकेट विश्वात पाऊल ठेवलं. 16 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत सुनील गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यात 34 शतके आणि 45 अर्धशतकांसह 10 हजार 122 धावांचा डोंगर रचला तर 108 एकदिवसीय सामन्यांत एक शतक आणि 27 अर्धशतकांसह 3 हजार 92 धावा केल्या. तर दिलीप वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यांत 17 शतके आणि 35 अर्धशतकांसह 6 हजार 868 धावा फटकवल्या. तसेच 129 एकदिवसीय सामन्यांत त्यांच्या नावावर एक शतक आणि 23 अर्धशतकासह 3 हजार 508 धावा आहेत.

4/5
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने माजी अध्यक्ष माधव मंत्री यांच्या स्मरणार्थ क्रिकेट व्याख्यानाची परंपरा सुरू करण्यात येणार आहे. पहिले व्याख्यान देण्याचा मान सुनील गावस्कर यांना देण्यात आलाय. खरं तर सुनील गावस्करांसाठी हा खूप स्पेशल दिवस असणार आहे. कारण त्यांचे मामा माधव मंत्री यांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा व्याखानाचा कार्यक्रम होतो आहे आणि पहिल्याच व्याख्यानाचा मान मिळालाय तो सुनील गावस्कर यांना…!

5/5
सुनील गावसकर सध्या क्रिकेट समालोचन करत असतात. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलदरम्यान गावसकर इंग्रजी समालोचन करताना पाहायला मिळाले. ते सातत्याने भारतीय क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करत असतात. अनेकदा खेळाडूंविषयी, त्यांच्या फॉर्मविषयी, संघातील निवडीबाबत ते सातत्याने भूमिका घेतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI