Dhruv Jurelचा तडाखा, दुसऱ्या कसोटीत सलग दुसरं शतक, दक्षिण आफ्रिकेला चोपला
IND A vs SA A Dhruv Jurel Century : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी धमाका केलाय. ध्रुवने दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या दुसऱ्या अनऑफीशियल टेस्टमध्ये दुसरं शतक झळकावलं आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20I मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए टीम दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध अनऑफीशियल टेस्ट सीरिज खेळत आहे. भारताने ऋषभ पंत याच्या नेतृत्वात पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ध्रुव जुरेल याने धमाका केला आहे. जुरेलने दुसर्या सामन्यातील दुसऱ्या डावात सलग दुसरं शतक झळकावतं भारताला चांगल्या स्थितीत पोहचवलं आहे. उभयसंघातील हा सामना बंगळुरुतील सीओईच्या ग्राउंड नंबर 1 मध्ये खेळवण्यात येत आहे.
इंडिया ए टीमची दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात घसरगुंडी झाली होती. मात्र ध्रुवने भारताची लाज राखली. ध्रुवने सर्वाधिक धावा करत भारताला 200 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. ध्रुवने नाबाद 137 धावा केल्या. त्यामुळे भारताला पहिल्या डावात ऑलआऊट 255 रन्स करता आल्या. त्यानंतर आता ध्रुवने दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकलं आहे. ध्रुवने या शतकासह इंडिया ए टीमला दुसऱ्या डावात चांगल्या स्थितीत आणून ठेवलं.
ध्रुवचा डबल धमाका
Determined Dhruv 🫡
Back-to-back fighting hundreds from Dhruv Jurel 💯@IDFCFIRSTBank | #INDAvSAA | @dhruvjurel21 https://t.co/19XXlh5VAN
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 8, 2025
ध्रुवने दुसऱ्या डावात 159 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ध्रुवने या डावात 12 चौकार लगावले. ध्रुवच्या फर्स्ट क्लास क्रिकेट कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं. तसेच ध्रुवने या शतकी खेळीदरम्यान भारताला मोठी आघाडी मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावलीय.
सहाव्या विकेटसाठी मोठी भागीदारी
ध्रुव आणि हर्ष दुबे या जोडीने सहाव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या जोडीच्या भागीदारीमुळे इंडिया ए टीम पाहुण्यांना बॅकफुटवर टाकण्यात यशस्वी ठरली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 150 बॉलमध्ये 184 रन्सची पार्टनरशीप केली. हर्ष 116 बॉलमध्ये 84 रन्सवर आऊट झाला आणि यासह ही जोडी फुटली. हर्षने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार लगावला.
दक्षिण आफ्रिकेसमोर 417 धावांचं आव्हान
दरम्यान इंडिया एने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 221 रन्सवर ऑलआऊट करत 34 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसरा डाव हा 89.2 षटकांत 7 बाद 382 धावांवर घोषित केलाय. त्यामुळे आफ्रिकेला आता मालिकेत बरोबरी करायची असेल तर 417 धावांचं आव्हान गाठावं लागणार आहे. दुसऱ्या डावातही ध्रुव जुरेल याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. ध्रुवने नाबाद 127 धावा केल्या. तर कॅप्टन ऋषभ पंत याने 65 धावांचं योगदान दिलं.
