AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG | इंडिया-अफगाणिस्तान टी 20 सामने कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?

India vs Afghanistan T20i Series Streaming | टीम इंडिया नववर्षातील पहिलीच आणि टी 20 मालिका ही अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी होणार आहे. जाणून घ्या सर्व सामने टीव्ही आणि मोबाईवर कुठे पाहता येणार?

IND vs AFG | इंडिया-अफगाणिस्तान टी 20 सामने कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?
| Updated on: Jan 09, 2024 | 3:19 PM
Share

मुंबई | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध या मालिकेसाठी अफगाणिस्तान आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर पुन्हा एकदा भारत दौरा करणार आहे. या टी 20 सीरिजमध्ये उभयसंघात एकूण 3 सामने होणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना या सीरिजमध्ये चमकदार कामगिरी करुन वर्ल्ड कपमध्ये आपला दावाही मजबूत करण्याची संधी आहे.

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेचं आयोजन हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं नोव्हेंबर 2022 नंतर टीममध्ये कमबॅक झालंय. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रोहित-विराट या दोघांचा खेळ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या मालिकेतील तिन्ही सामने कुठे-कधी पाहता येतील हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया-अफगाणिस्तान मालिका ही टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल. इंग्रजी, तमिळ तेलुगु आणि कन्नड या 4 भाषांमध्ये या नेटवर्क चॅनेल्सवर कॉमेंट्री ऐकता येईल. तसेच कलर्स सिनेप्लॅक्स या चॅनेलवर हिंदी कॉमेंट्रीसह सामना पाहता येईल. खालील ट्विटमध्ये तुमच्या डीटुएच ऑपरेटरनुसार जाणून घ्या की मॅच कोणत्या चॅनेलवर दिसणार.

तसेच मोबाईल आणि टीव्हीवर सामने जिओ सिनेमावर मोफत पाहता येतील. एकूण 11 भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना कॉमेंट्री ऐकता येणार आहे.या 11 भाषांमध्ये मराठीचाही समावेश करण्यात आलेला आहे.

सामने कोणत्या चॅनेल्सवर पाहता येणार?

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.