Ind vs Afg : रोहित, विराटला आज अफगाणिस्तानच्या ‘या’ दोन बॉलरपासून संभाळून राहण्याची गरज
Ind vs Afg : टीम इंडिया सुपर-8 मध्ये आपला पहिला सामना गुरुवार 20 जून रोजी खेळणार आहे. अफगानिस्तान विरुद्ध बारबाडोसमध्ये हा सामना होणार आहे. अफगाणिस्तानच्या टीमला हलक्यामध्ये घेण्याची चूक टीम इंडिया अजिबात करणार नाही. कारण त्यांच्याकडे मजबूत गोलंदाजी युनिट आहे.

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या सुपर-8 राऊंडमधील सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. टीम इंडियाने चालू वर्ल्ड कपमध्ये पहिले तिन्ही सामने जिंकले. आता, मात्र चॅलेंज आणखी वाढणार आहे. अफगाणिस्तानचे लेफ्ट आर्म गोलंदाज टीम इंडियाच्या मार्गात अडथळा ठरु शकतात. अफगाणिस्तानचा लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी आणि लेफ्ट आर्म स्पिनर नूर अहमद रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात. भारताचे दोन्ही ओपनर लेफ्ट आर्म गोलंदाजी खेळताना नेहमीच संघर्ष करताना दिसलेत. या सामन्यातही त्यांच्यासाठी हेच चॅलेंज असेल.
रोहित शर्मा धोकादायक ओपनर आहे. पण लेफ्ट आर्म गोलंदाजी खेळताना त्याला नेहमीच संघर्ष करावा लागलाय. चालू T20 वर्ल्ड कपमध्ये त्याने तिन्ही सामन्यात फलंदाजी केलीय. एकदा रिटायर्ड हर्ट तर दोनवेळा आऊट झालाय. लेफ्ट आर्म पेसरने दोन्हीवेळा त्याचा विकेट घेतलाय. पाकिस्तान विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदीने त्याला आऊट केलं. अमेरिकेविरुद्ध सौरभ नेत्रवाळकरने पावरप्लेमध्ये त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. विराट कोहलीने सुद्धा नेहमीच लेफ्ट आर्म गोलंदाजी विरोधात संघर्ष केलाय. अमेरिकेचा लेफ्ट आर्म पेसर सौरभ नेत्रावळकरने त्याचा विकेट काढला. अफगानिस्तानचा लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज फजलहक फारूकी दोन्ही फलंदाजांसाठी पावरप्लेमध्ये धोकादायक आहे.
दोघे भन्नाट फॉर्ममध्ये
फारूकी या टुर्नामेंटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतोय. पावरप्लेमध्ये त्याच्या स्विंग होऊन आतमध्ये येणाऱ्या चेंडूंनी फलंदाजांना बऱ्याचदा अडचणीत आणलय. त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 12 विकेट काढलेत. त्याशिवाय टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 12 पैकी 9 विकेट पावरप्लेमध्ये घेतले आहेत. फारूकीशिवाय नूर अहमद सुद्धा टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतो. कोहली लेफ्ट आर्म स्पिनर विरोधात धावा बनवण्यात नेहमीच अयशस्वी ठरलाय. आयपीएलमध्ये नूर अहमद गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याने नेहमीच विराटला अडचणीत आणलय.
