IND vs AUS 1st Odi | मोहम्मद शमी याचा कांगारुंना ‘पंच’, टीम इंडियाला 277 धावांचं आव्हान
India vs Australia 1st Odi | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.

मोहाली | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी टीम इंडियाला 277 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 276 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर याने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीला टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या तिकडीने चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
ऑस्ट्रेलिया टॉस जिंकून बॅटिंगसाठी मैदानात आली. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. शमीने मिचेल मार्श याला आऊट केलं. टॉप ऑर्डरमध्ये मिचेलचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही या सुरुवातीचा फायदा घेत मोठी खेळी साकारता आली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या कांगारुंना वेळीच मोठी खेळी करण्यापासून रोखलं.
मिचेल मार्श याने 4 धाा केल्या. डेव्हिड वॉर्न याने 53 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली. स्टीव्हन स्मिथ 60 बॉलमध्ये 41 धावा करुन माघारी परतला. मार्नस लबुशेन याने 39 धावांचं योगदान दिलं. कॅमरुन ग्रीनने 31 धावा जोडल्या. जोस इंग्लिसला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र त्याआधीच बुमराहने त्याचा काटा काढला. बुमराहने इंग्लिसला 45 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
पहिला डाव संपला
Innings Break!
A sensational fifer for @MdShami11 in the 1st ODI as Australia are all out for 276 runs.#TeamIndia chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard – https://t.co/H6OgLtww4N… #INDvAUS@IDFCFIRSTBank pic.twitter.com/94BglCwLgt
— BCCI (@BCCI) September 22, 2023
मार्कस स्टोयनिस याने 21 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. मॅथ्यू शॉर्ट 2 धावांवर आऊट झाला. सिन एबोर्ट आणि एडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी 2-2 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस सिन एबोट याने नाबाद 21 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 250 पेक्षा अधिक धावा करता आल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने 10 ओव्हरमध्ये 51 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रविंद्र जडेजा तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन) डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरुन ग्रीन, जोस इंग्लिस (विकेटकीपर), मार्क्स स्टोयनिस, एम शॉर्ट, सिन एबोट आणि एडम झॅम्पा.