INDvsAUS : ऑलराउंडर रवींद्र जाडेजा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून ‘आऊट’?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून रवींद्र जाडेजा याचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. मात्र जडेजाला पहिल्या कसोटीला मुकावं लागू शकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

INDvsAUS : ऑलराउंडर रवींद्र जाडेजा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून 'आऊट'?
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 9:22 PM

नागपूर : टीम इंडियाचा बॅट्समन श्रेयस अय्यर याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकावं लागलं आहे. टीम इंडिया या धक्क्यातून सावरुन जोरदार सराव करत आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेतून ऑलराउंडर रवींद्र जडेजाने कमबॅक केलंय. जडेजाबद्दल टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी मोठं विधान केलं आहे. शास्त्री यांनी अशा एका खेळाडूचा नाव सांगितलं जो जडेजासाठी धोकादायक ठरु शकतो.

जडेजा पहिल्या कसोटीतून बाहेर?

उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा 9 फेब्रुवारीपासून सुरु होतोय. हा पहिला सामना नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. रवी शास्त्री यांच्यानुसार, पहिल्या कसोटीत अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा या दोघांपैकी एकालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

शास्त्री काय म्हणाले?

अक्षर हा जडेजासारखाच खेळाडू आहे. दोघेही फिरकी गोलंदाज आहेत. तसेच लोअर ऑर्डरमध्ये निर्णायक क्षणी मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. दोघांमध्ये एकसारखीच स्कील आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हमध्ये दोघांपैकी एकालाच संधी मिळेल, असं शास्त्री एका टीव्ही शोमध्ये म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अक्षर पटेलला संधी मिळण्याची शक्यता

जडेजाचं टीममध्ये तब्बल 5 महिन्यांनी कमबॅक झालं आहे. जडेजाच्या जागी टीममध्ये अक्षरला संधी मिळत होती. अक्षरने टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये शानदार कामगिरी केली. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा याची अक्षर पहिली पसंत ठरु शकतो.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.