AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : कॅप्टन सूर्या एक्शन मोडमध्ये, पराभवानंतर तिसऱ्या टी 20I साठी Playing 11 बदल फिक्स! कुणाला डच्चू देणार?

India vs Australia 3rd T20i : दुसर्‍या सामन्यात भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर ढेर झाले. भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे तिसऱ्या टी 20i सामन्यांसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये काही बदल अपेक्षित आहेत.

AUS vs IND : कॅप्टन सूर्या एक्शन मोडमध्ये, पराभवानंतर तिसऱ्या टी 20I साठी Playing 11 बदल फिक्स! कुणाला डच्चू देणार?
Bumrah Varun Suryakumar Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Nov 01, 2025 | 10:33 PM
Share

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय मालिका गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याही नेतृत्वात टीम इंडियाने टी 20i मालिकेतील सुरुवात पराभवानेच केली. पहिला सामना पावसाने ढापला. तर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना हा 4 विकेट्सने जिकंत मालिकेत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे भारतासमोर तिसऱ्या सामन्यात कमबॅक करण्याचं आव्हान आहे. सूर्यासेना तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या मॅचमधील पराभवाची परतफेड करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. मात्र दुसर्‍या सामन्यातील पराभवानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकतो. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये किती बदल होऊ शकतात? हे आपण जाणून घेऊयात.

अर्शदीपला हर्षितच्या जागी संधी?

पावसामुळे पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात फक्त 9.4 ओव्हरचाच खेळ झाला. पावसामुळे सामना रद्द झाल्याने भारताची बॉलिंग करण्याची वेळ आली नाही. मात्र टीम इंडियाचा सर्वात यशस्वी टी 2oi बॉलर अर्शदीप सिंग याला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली नाही. अर्शदीपला दुसऱ्या सामन्यातूनही वगळण्यात आलं. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात तरी अर्शदीपला संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अर्शदीपला हर्षित राणा याच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

कुलदीपच्या जागी वॉशिंग्टनला संधी?

भारताला दुसऱ्या टी 20i सामन्यात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची उणीव जाणवली. तर दुसर्‍या बाजूला चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव याने अवघ्या 20 बॉलमध्ये अर्थात 3.2 ओव्हरमध्ये 45 धावा लुटवल्या. कुलदीपने 2 विकेट्स घेतल्या. मात्र त्याने जवळपास 14 च्या इकॉनमीने धावा दिल्या. त्यामुळे कॅप्टन सूर्याकडून कुलदीपच्या जागी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली जाऊ शकते.

संजूच्या जागी जितेश शर्माला संधी?

दुसऱ्या टी 20i सामन्यात अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या दोघांचा अपवाद वगळता इतर 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. फलंदाजांनी कांगारुंच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. संजू सॅमसन याने बॅटिंग आणि विकेटकीपिंगही निराशाजनक केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यासाठी संजूच्या जागी विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा याला संधी मिळणार का? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

तिसर्‍या टी 20I मॅचसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन/जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह अक्षर पटेल, हर्षित राणा/अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.