AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ‘हा’ बॉलर भारताला पराभवापासून वाचवू शकतो, फक्त इंदोरमध्ये मोडावा लागेल एक दिवस जुना रेकॉर्ड

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाला सर्वोत्तम दर्जाच क्रिकेट खेळाव लागेल. टीम इंडियासाठी सध्या जी गोष्ट अशक्य वाटतेय, ती फक्त एक एक गोलंदाज साध्य करु शकतो.

IND vs AUS : 'हा' बॉलर भारताला पराभवापासून वाचवू शकतो, फक्त इंदोरमध्ये मोडावा लागेल एक दिवस जुना रेकॉर्ड
जागा 1 दावेदार 2, रोहित शर्मा केएल राहुल याच्या जागी टीममध्ये कुणाला खेळवणार?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 03, 2023 | 7:47 AM
Share

IND vs AUS 3rd Test : इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 76 धावांची गरज आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी हे लक्ष्य़ खूपच सोपं आहे. पराभव टाळण्यासाठी टीम इंडियाला सर्वोच्च दर्जाच प्रदर्शन कराव लागेल. ऑस्ट्रेलिया ही काही नामीबिया, हॉलंडची टीम नाही. पूर्णपणे व्यावसायिक दिग्गज खेळाडूंनी भरलेली ही टीम आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाला सर्वोत्तम दर्जाच क्रिकेट खेळाव लागेल. टीम इंडियासाठी सध्या जी गोष्ट अशक्य वाटतेय, ती फक्त एक एक गोलंदाज साध्य करु शकतो. त्याचं नाव आहे, रविचंद्रन अश्विन. यासाठी अश्विनला एक दिवस जुना रेकॉर्ड मोडावा लागेल.

सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

इथे एक दिवस जुन्या रेकॉर्डचा अर्थ नाथन लेयॉनच्या भारताच्या दुसऱ्याडावात केलेल्या कामगिरीशी आहे. गुरुवारी नाथन लेयॉनने दुसऱ्या डावात टीम इंडियाचे 8 विकेट काढून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नाथन लेयॉनच्या नावावर आता 113 विकेट आहेत. या बाबतीत त्याने अनिल कुंबळेचा 111 विकेट्सचा रेकॉर्ड मोडला.

अश्विनच्या नावावर किती विकेट?

आज अश्विनकडे नाथन लेयॉनने एकदिवस आधी केलेला रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. असं झाल्यास भारतासाठी जी गोष्ट अशक्य वाटतेय, ती शक्य होऊ शकते. आता रेकॉर्ड तोडण्यासाठी अश्विनला काय कराव लागेल? सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विनच्या नावावर 106 विकेट आहेत. म्हणजे नाथन लेयॉनचा 113 विकेटचा रेकॉर्ड तोडण्यापासून तो 8 विकेट दूर आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्याडावात अश्विनला 8 विकेट काढाव्या लागतील, तरच भारताचा पराभव टळू शकतो. फिरकी गोलंदाजांनी कमाल दाखवावी

याआधी नागपूर आणि दिल्ली कसोटी तीन दिवसात निकाली निघाली होती. आता इंदोर कसोटी सुद्धा तीन दिवसातच निकाली निघणार आहे. आतापर्यंत या टेस्ट सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव एका सेशनमध्ये संपल्याच दिसून आलाय. त्यांचे धडाधड विकेट गेल्यात. आज सुद्धा असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांना कमाल दाखवावी लागेल.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.