IND vs AUS | कॅप्टन सूर्यकुमार मालिका विजयानंतर आनंदी, विजयाचं श्रेय या खेळाडूंना
Suryakumar Yadav Reaction IND vs AUS 5TH T20I | टीम इंडियाने कांगारुंचा टी 20 मालिकेत 4-1 ने सुपडा साफ केला. सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत शानदार कामगिरी केली. सूर्याने पाच्या सामन्यातील विजयाचं श्रेय कुणाला दिलं?

बंगळुरु | टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियावर पाचव्या टी 20 सामन्यात 6 धावांनी थरारक विजय मिळवला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 161 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना कांगारुंना शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. मैदानात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मॅथ्य वेड खेळत होता. तर अर्शदीप सिंह हा शेवटची ओव्हर टाकत होता. अर्शदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांचा बचाव केला आणि टीम इंडियाला चौथा विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. अर्शदीपने अवघ्या 3 धावा दिल्या आणि मॅथ्यू वेडची विकेट घेत मॅच टीम इंडियाच्या बाजूने फिरवली. टीम इंडियाने या विजयासह मालिका 4-1 ने जिंकली. या विजयानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने आनंद व्यक्त केला. तसेच सूर्याने विजयाचं श्रेय कुणालं दिलं, तो काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
“ही एक चांगली मालिका राहिली.टीम इंडियाच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे आपलं कौशल्य दाखवलं ते कौतुकास्पद होतं. आम्ही निर्भिडपणे खेळायचं ठरवलं होतं. तसेच खेळाचा आनंद घ्यायचा होता. मी फार आनंदी आहे. जर तो वॉशिंग्टन सुंदर असता तर ते एड ऑन असतं.”,असं सूर्यकुमार म्हणाला. तसेच विजयी आव्हानाबाबातही सूर्याने प्रतिक्रिया दिली. “या खेळपट्टीवर 160-175 ही अवघड धावसंख्या आहे. मी 10 ओव्हरनंतर खेळाडूंना सांगतिलं की आपलं सामन्यातील आव्हान अजून कायम आहे.”, असंही सूर्याने विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हटलं.
मॅन ऑफ द सीरिज कोण?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. रवीने 5 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. रवीला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. रवीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली. “मी पहिल्या सामन्यात बॉलिंग केली नाही. मी फक्त ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं. स्टंप टु स्टंप बॉलिंग करायंच हे माझं निश्चित आहे.”, असं रवी बिश्नोई याने स्पष्ट केलं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.
