AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : तब्बल 10 वर्षांपासूनचा दुष्काळ संपवण्याचा रोहित शर्मा अँड कंपनीला संधी, 5 दिवसात बदलणार इतिहास?

WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन बलाढ्य संघ एकमेकांना भिडणार आहेत. टीम इंडियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या हा सामना जिंकला तर गेल्या दहा वर्षांपासून पडलेला दुष्काळ संपवण्याची संधी टीम इंडियाला आहे.

WTC Final : तब्बल 10 वर्षांपासूनचा दुष्काळ संपवण्याचा रोहित शर्मा अँड कंपनीला संधी, 5 दिवसात बदलणार इतिहास?
| Updated on: Jun 06, 2023 | 8:18 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याला (WTC Final 2023) अवघे काही तास शिल्लक आहे. या सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन बलाढ्य संघ एकमेकांना भिडणार आहेत. टीम इंडियासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा सामना जिंकला तर गेल्या दहा वर्षांपासून पडलेला दुष्काळ संपवण्याची संधी टीम इंडियाला आहे. टीम इंडियाने गेल्या दहा वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही त्यामुळे फायनल सामना टीम इंडिया जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.

2013 मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन चॅम्पियन ट्रॉफी जिंकत शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालीच ही ट्रॉफी भारताने मिळवली होती. यानंतर भारताला तीन वेळा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता, तर चार वेळा उपांत्य फेरीत भारत पराभूत झाला होता. 2011 च्या टी-20 मध्ये विश्वचषकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातून भारत बाहेर पडला होता.

टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमच्या फायनलमध्ये खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनल गाठली होती. मात्र न्यूझीलंडकडून त्यावेळी भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. रवींद्र जडेजा आणि अश्विन या दोन्ही फिरकीपटूंना टीम मॅनेजमेंट खेळवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हा डाव त्यांच्यावरच पलटला होता.

दरम्यान, 7 जूनला होणारा सामना हा उन्हाळा असल्याने वेगवान गोलंदाज हा खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतात. यामध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज तर तिसरा पर्याय म्हणून उमेश यादव असणार आहे. त्यासोबतच ऑल राऊंडर म्हणून शार्दुल ठाकूर यांची नावे निश्चित मानली जात आहेत. मात्र टीम मॅनेजमेंट अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, जोश इंग्लिस, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

राखीव: मिचेल मार्श आणि मॅट रेनशॉ.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, केएस भरत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव .

राखीव: यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.