AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

indvs ban 1st Test : नाद करा पण पंतचा कुठं! रिषभने बॅटींग करताना लावली बांगलादेशची फिल्डिंग, Video एकदा पाहाच

IND vs BAN 1st Tets : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिषभने बांगलादेशच्या खेळाडूंना स्वत: बॅटींग करताना फिल्डिंग कशी लावायची हे सांगितलं आहे.

indvs ban 1st Test : नाद करा पण पंतचा कुठं! रिषभने बॅटींग करताना लावली बांगलादेशची फिल्डिंग, Video एकदा पाहाच
| Updated on: Sep 21, 2024 | 6:10 PM
Share

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यात तिसरा दिवस युवा खेळाडूंनी गाजवला. रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतके झळकवत टीम इंडियाला भक्कम स्थितीत पोहोचवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाला विजयासाठी सहा विकेट तर बांगलादेशला 357 धावांची आवश्यकता आहे. त्याआधी रिषभ पंत याने 128 चेंडूत 109 धावांची खेळी केली, वन डे स्टाईल शतकी खेळीमध्ये 13 चौकार आणि 4 षटकार मारले होते. रिषभ पंत मैदानावर म्हटल्यावर मैदानावर काहीतरी होणारच, रिषभचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने बांगलादेशला फिल्डिंग लावताना काही सल्ले दिले महत्त्वाचं म्हणजे त्यांनीही तशा प्रकारेच फिल्डिंग सेट केली.

रिषभ पंत मैदानावर स्टम्पच्या मागे असताना किंवा बॅटींग करताना नेहमी काहीना काही बोलतो. याचे अनेक स्टम्प माईकमध्ये अनेक व्हिडीओ रेकॉर्ड होतात. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यामध्ये पठ्ठ्याने शतक करण्याआधी बांगलादेशची फिल्डिंग लावली. पंत स्ट्राईकवर असताना, तो बांगलादेशच्या बॉलरला मिड-विकेटकडे बोट दाखवत, अरे भाई इथे एक येईल असं सांगितलं. त्यानंतर बॉलरनेही त्या ठिकाणी फिल्डर लावला.

पाहा व्हिडीओ:-

रिषभ पंत अपघात झाल्यावर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. पठ्ठ्याने पहिल्याच सामन्यात कसोटीमध्ये शतक केलं आहे. इतकंच नाहीतर टीम इंडियाचा विकेटकीपर म्हणून त्याने सर्वाधिक शतके आपल्या नावावर केली आहेत. महेंद्र सिंह धोनीचीही कसोटीमध्ये सहा शतके आहेत. रिषभने आणखी एक शतक केल्यावर त्याच्या नावावर या विक्रमाची नोंद होणार आहे.

बांगलादेश प्लेइंग 11 : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.